EPFO खाते असणाऱ्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये मिळणार? पण कसे? जाणून घ्या...

EPFO News : ईपीएफओने एक्स-ग्रेशिया रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ईपीएफओ खातेधारकांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
EPFO
EPFOx
Published On
Summary
  • EPFOने मृत्यू मदत निधीतील एक्स-ग्रेशिया रक्कम १५ लाख रुपयांपर्यंत वाढवली असून, हे पैसे खातेदारांच्या कुटुंबीयांना मिळणार आहेत.

  • ही रक्कम सेवेदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना, कायदेशीर वारसाला किंवा नोंदणीकृत व्यक्तीला दिली जाईल.

  • रक्कम १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल आणि दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढवली जाणार आहे, ज्यामुळे पीडित कुटुंबाला आर्थिक मदत होईल.

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO कडून नोकरी करणाऱ्यांचे PF खाते सुरु केले जाते. त्यानंतर दरमहा कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कापली जाते आणि PF खात्यात जमी होते. त्याच वेळी कंपनी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यातही तीच रक्कम जमा करते. EPFO यावर वार्षिक व्याज देखील देते. या EPFO खातेधारकांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

१५ लाख रुपये कशासाठी मिळतील?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFO ने मृत्यू मदत निधी/ मृत्यू लाभ योजना या अंतर्गत दिलेली एक्स-ग्रेशिया रक्कम वाढवली आहे. रक्कम १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही एक्स-ग्रेशिया रक्कम ८.८ लाख रुपये होती. ही नवीन रक्कम १ एप्रिल २०२५ पासून लागू केली जाणार आहे. ही रक्कम सेवेदरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोंदणीकृत व्यक्तीला दिली जाईल.

EPFO
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

१५ लाख रुपये कोणाला मिळतील?

योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्यांना त्यांचे कायदेशीर वारसदार नेमणे आवश्यक असते. कामादरम्यान किंवा सेवेदरम्यान ज्या कर्मचाऱ्याचा मृत्यू होईल. त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला, कायदेशीर वारसाला किंवा नोंदणीकृत व्यक्तीला ही १५ लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.

EPFO
Pune : पुण्यात १७ हजार मतदार बोगस? सरपंचाचा खळबळजनक दावा; पुरावेही दाखवले

१५ लाख रुपये कुठून येतील आणि हा निर्णय का घेण्यात आला?

१५ लाख रुपये हे रेशन कर्मचारी कल्याण निधीतून दिले जातील. १ एप्रिल २०२६ पासून ही रक्कम दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढेल असे EPFO ने म्हटले आहे. महागाई आणि वाढत्या खर्चामुळे पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी हा निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. या मंडळात सरकार, नियोक्ते आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी असतात.

EPFO
Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात १२,००० स्पेशल ट्रेन चालवणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com