Who Is Rajabhau Munde And Babri Munde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपला धक्का देत NCP मध्ये जाणारे मुंडे पिता-पुत्र नेमके कोण?

Who Is Rajabhau Munde And Babri Munde: बीडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी भाजपची साथ सोडली. हे पिता-पुत्र ७ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

Priya More

Summary -

  • बीडमधील वडवणीतील राजाभाऊ आणि बाबरी मुंडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

  • ७ ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार.

  • राजाभाऊ- बाबरी मुंडे हे पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक होते.

  • बाबरी मुंडे यांचा वडवणी आणि माजलगाव परिसरात दबदबा आहे.

  • मुंडे पिता-पुत्रांच्या प्रवेशामुळे बीडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार.

बीड जिल्ह्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. बीडच्या वडवणीतील मुंडे पिता-पुत्रांनी पंकजा मुंडे यांची साथ सोडली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत सावलीप्रमाणे उभे राहिलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला. मुंडे पिता-पुत्रांनी अचानक साथ सोडल्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला.

राजाभाऊ मु्ंडे आणि बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. ७ ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. पंकजा मुंडेंची साथ सोडणारे त्याचे कट्टर समर्थन मुंडे पिता-पुत्र आहेत तरी कोण हे आपण जाणून घेणार आहोत....

पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे भाजपला सोडचिठ्ठी दिली. हा भाजपसाठी बीडमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंडे पिता-पुत्रांच्या पक्ष प्रवेशामुळे आता बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद आणखी वाढणार आहे.

मुंडे पिता-पुत्रांनी पंकजा मुंडे यांची साथ सोडण्यामागचं कारण देखील सांगितले. 'संघर्षकाळात पक्षासाठी एकनिष्ठेने काम केले. पण पक्ष आणि नेत्यांकडून स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं. न्याय मिळत नसेल, तर अशा पक्षात राहण्यात अर्थ नाही.', अशी मनातील खदखद बाबर मुंडे यांनी बोलून दाखवली. तसंच, 'अजितदादा जी जबाबदारी देतील ती मी प्रामाणिकपणे आणि समक्षपणे पार पाडेन.', असं देखील बाबरी मुंडे यांनी सांगितले.

राजाभाऊ मुंडे यांची दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे जवळचे सहकारी अशी ओळख आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ते पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घोटाळा झाला होता. बँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी आणि बनावट संस्थाना कर्ज वाटप केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना २ वर्षे तुरूंगात काढावी लागली.

तर, राजाभाऊ मुंडे यांचा मुलगा बाबरी मुंडे हे वडवणी नगरपंचायतीचे माजी नगर अध्यक्ष असून वडवणी तालुक्यासह माजलगावमध्ये त्यांचा चांगला दबदबा आहे. बाबरी मुंडे यांनी माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक ही लढवली होती त्यांना १८००० मते मिळाली होती. बाबरी मुंडे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबरोबरच वडवणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तराखंडमध्ये मुलुंड मधील 62 जणांचा ग्रुप अडकला

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी शेवटची लढाई, एकत्र या; जरांगे पाटील यांचे आवाहन

शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराची मस्ती जिरवायची, भाजपच्या आमदाराची उघड धमकी, नेमकं प्रकरण काय?

Crime News : ५० वर्षीय बॉयफ्रेंडच्या प्रेमात आकंठ बुडाली, २ मुलांच्या आईनं नवऱ्याला 'शांत डोक्यानं' संपवलं

Laxmi Narayan Rajyog: 50 वर्षांनंतर बनणार नवपंचम-लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

SCROLL FOR NEXT