Maharashtra Politics: "भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करावं"

Pankaja Mundes CM Candidature Gains Momentum: पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात, तसेच पुरूष हक्क आयोगाची स्थापना करावी, तृप्ती देसाईंची मागणी.
Pankaja Munde news
Pankaja MundeSaam Tv
Published On

"मंत्री पंकजा मुंडे या मुख्यमंत्रीपदाचा आक्रमक चेहरा आहेत. भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी", असं भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मागणी केली आहे. तसेच "भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्यास, महिला म्हणून आम्ही भाजपच्या निर्णयाचे स्वागत करू", असेही तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे.

पंकजा मुंडे या मुख्यमंत्रीपदाचा आक्रमक चेहरा

तृप्ती देसाई आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. दर्शनानंतर देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्या पाहिजे, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. "राज्यातील अनेक महिला विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत. मात्र, आजवर राज्याला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही", याकडे तृप्ती देसाई यांनी लक्ष वेधलं.

तसेच "पंकजा मुंडे या मुख्यमंत्रीपदाचा आक्रमक चेहरा आहेत. जर, भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, तर महिला म्हणून भाजपच्या निर्णयाचे स्वागत करू", असे तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

Pankaja Munde news
Viral: भररस्त्यात टॉवेल गुंडाळून आली अन् आंघोळही केली; शेवटी सगळ्यांसमोर टॉवेल काढला अन् मग..VIDEO व्हायरल

पुरूष अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

पुरूषांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर तृप्ती देसाई यांनी पुरूष हक्क आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी केली आहे. "राज्यात पुरूषांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे अत्यंत दुर्देवी आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी महिला आयोगाच्या धर्तीवर पुरूष हक्क आयोगाची स्थापना करण्यात यावी", अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

Pankaja Munde news
Nitin Gadkari: "शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर, त्यांनी अफझल खानाची कबर.." गडकरींचा भाजप नेत्याला घरचा आहेर

अलीकडच्या काळात पुरुषांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात तृप्ती देसाई यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी पुरूष हक्क आयोगाची स्थापना करावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com