Maharashtra Politics: एका आठवड्यात दोनदा दिल्ली दौरा; एकनाथ शिंदे-अमित शहा यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Eknath Shinde In Delhi: एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अमित शहा यांच्या भेट घेतली. त्यांच्या सोबत त्यांनी महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा केलीय. एकाच आठवड्यात ते दोनवेळा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Eknath Shinde In Delhi
Union Home Minister Amit Shah discusses With Eknath shindesaam tv
Published On
Summary
  • दिल्लीतील बैठकीत अमित शहा आणि शिंदे यांच्यात महापालिका निवडणुकांबाबत चर्चा.

  • प्रत्येक महानगरासाठी वेगळी रणनीती, प्रचार यंत्रणा आणि बूथ लेव्हलवर नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

  • महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जाणार

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच आठवड्यात दोन वेळा दिल्ली दौरा केला. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील महायुती सरकारमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. दरम्यान शिंदे आणि शहा यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत आता वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.

राज्याच्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील अधिकारांवरून संघर्ष पेटला असल्याची चर्चा सुरूय. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान काय घडलं? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची सविस्तर माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "अधिवेशन सुरू असताना मी येत दिल्लीत येत असतो.

Eknath Shinde In Delhi
Nashik politics : नाशिकचे राजकारण पुन्हा पेटणार, ध्वजारोहणाचा मान कुणाला? महाजन, भुसेंना कॉर्नरकरून भुजबळांना मान?

आमचे खासदारही गृहमंत्र्यांना भेटले आहेत. त्यांच्या मतदारसंघांशी संबंधित काही मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांचे काही प्रश्न समस्या होत्या, त्या अमित शहायांच्यासमोर मांडल्या. मागच्या आठवड्यात दिल्ली दौरा केला होता, त्यावेळी मी त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे मी आता भेटलो. ही सदिच्छा भेटही झाली आणि खासदारांच्या समस्या होत्या बाबतही चर्चा झाल्याचं शिंदे म्हणाले.

स्वराज संस्थेच्या निवडणुकीबाबत प्लॅन काय?

दरम्यान दिल्ली अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटीत महापालिकांच्या निवडणुकांबाबत काय प्लॅन असणार याचीही माहिती त्यांनी यावेळी सांगितली. एनडीए होण्याआधी भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांची एकच विचारधारा होती, त्यामुळे त्यांची युती झाली.

त्यामुळे शिवसेना एनडीएमधील भाजपचा सर्वात जुना पार्टनर आहे. खासदारसोबत असल्यानं अमित शहा यांच्याशी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. महायुती म्हणून आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात विजय मिळवला. आता महायुती म्हणून आम्ही स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका लढून आणि जिंकू. यावर अमित शहा यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.

Eknath Shinde In Delhi
Maharashtra Politics : फडणवीस-शिंदेंमध्ये वर्चस्वाची लढाई, एकाच पदासाठी दोघांकडून वेगवेगळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून घेतला चिमटा

दरम्यान महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दोन ते तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावर बोलताना एकनाथ शिंदेंनी त्यांना चिमटा काढला. ते दिल्ली दौऱ्यावर आलेत त्यावर मी काय बोलावं. मी जाहीरपणे दिल्ली येतो भेटतो. ज्या सकारात्मक चर्चा करतो. राज्य आणि केंद्राचे काही प्रकल्प आहेत, योजना आहेत त्यावर चर्चा करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com