Nashik politics : नाशिकचे राजकारण पुन्हा पेटणार, ध्वजारोहणाचा मान कुणाला? महाजन, भुसेंना कॉर्नरकरून भुजबळांना मान?

Independence Day Honor : छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात मुख्य ध्वजारोहणाच्या मानासाठी स्पर्धा आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष – भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (AP) या पदासाठी आपला दावा करत आहेत.
Girish Mahajan
Girish Mahajan Saam tv
Published On
Summary
  • नाशिकमध्ये १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या मानावरून महायुतीतील मंत्री एकमेकांसमोर.

  • छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात अघोषित शर्यत सुरू.

  • पालकमंत्रीपदाचा वाद सुटलेला नाही, त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनिक ठप्पपणा.

  • मागील ध्वजारोहणाचा मान महाजनांना मिळाला होता; यंदा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

Nashik’s Guardian Minister post remains undecided amid political wrangle : महायुतीतील वाद हा नाशिकच्या राजकारणात नवीन नाही. पालकमंत्रिपदावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील मतभेद वारंवार समोर येतात. रायगड अन् नाशिक या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्याप सुटलेला नाही. त्यात आता यंदा, ध्वजारोहणाच्या मानाबाबतही असाच तणाव दिसतो. स्थानिकांच्या मते हा सोहळा एकप्रकारे राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. तरीही, शासकीय नियमानुसार, जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री यांच्यापैकी एकजणच हा मान मिळवण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल.

सध्या नाशिकमध्ये छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे असे चार मंत्री आहेत. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. हा मान कुणाला मिळतोय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. भुजबळ, महाजन की भुसेंना मुख्य ध्वजारोहण सोहळ्याचा मान? असा प्रश्न मागील काही दिवसांपासून नाशिकच्या राजकारणात विचारला जात आहे.

Girish Mahajan
Sambhaji Bhide Video : संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान, १५ ऑगस्ट अन् भगवा झेंड्यावर केले वक्तव्य

महायुतीचे सरकार आल्यापासून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. पालकमंत्रिपदाच्या वादात नाशिकचे पालकमंत्रिपद अद्यापही रिक्तच राहिलेले आहे. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी ( AP ) या महायुतीतील तिन्ही पक्षांनी पालकमंत्री पदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. छगन भुजबळ आणि भुसे नाशिकचे असल्यानं दोघांचा नैसर्गिक दावा तर महाजन कुंभमेळा मंत्री असल्यानं नाशिकवर लक्ष ठेवून आहेत.

Girish Mahajan
अकोल्यात धक्कादायक घटना, पत्नी-सासरच्यांच्या छळामुळे तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, व्हिडीओतून गंभीर आरोप

भुजबळ, भुस आणि भुजबळ या तिघांमध्ये पालकमंत्रिपदासाठी अघोषित शर्यत लागलेली आहे. पालकमंत्र्यांअभावी नाशिकच्या जिल्हा नियोजन समितीची बैठकही रखडली आहे, विकासकामांचा देखील खोळंबा उडाला आहे. मागील प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याची जबाबदारी शासकीय आदेशाद्वारे गिरीश महाजनांवर यांच्यावरच सोपवण्यात आली होती. आता १५ ऑगस्टच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याचा मान कुणाला? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Girish Mahajan
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी, औषधांवर २५० टक्के टॅरिफ, फार्मा क्षेत्राला धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com