Eknath Shinde vs CM Devendra fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नेमणुकीवरून नवं युद्ध सुरू असल्याचे समोर आले आहे. एका पदासाठी एकाच दिवशी दोन विभागांकडून दोन वेगवेगळ्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यातच आता फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचेही समोर आले आहे. डबघाईला आलेली बेस्ट सुधारण्यासाठी एकनाथ शिंदेंनी अश्विनी जोशींकडे अतिरिक्त कार्यभरा दिला तर फडणवीस यांच्या खात्याकडून त्याच पदावर आशिष शर्मांची नेमणूक करण्यात आली. (cm devendra fadnavis vs Eknath shinde clash)
नगरविकास खाते असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अश्विनी जोशी यांची नियुक्ती केली. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारे सामान्य प्रशासन विभागाकडूनही आयएएस आशिष शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. डबघाईला आलेल्या बेस्टला सुधारण्यासाठी कोण कार्यभर सांभाळणार? फडणवीस-शिंदे यांनी नेमणूक केलेल्यांपैकी कुणी एक पदभार घेणार की कुणी तिसऱ्यालाच आणून बसवणार, याकडे नजरा खिळल्या आहेत.
बेस्ट महाव्यवस्थापक पदावरुन शिंदे - फडणवीस आमनेसामने आल्याने महायुतीमधील समन्वयाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बेस्ट महाव्यवस्थापक पदावरुन शिंदे फडणवीसांमध्ये गोंधळ असल्याचे बोलले जात आहे. बीएमसीच्या दोन वेगवेगळ्या आयुक्तांची शिंदे आणि फडणवीसांकडून नियुक्ती झाली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन आशिष शर्मांकडे कार्याभार दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरुन अश्विनी जोशी यांच्याकडे कार्याभार दिला आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या दोन्ही खात्याने जीआर एकाच दिवशी आली आहे. धक्कादायक म्हणजे जीआरवर सहसचिवांची स्वाक्षरीही आहे.
बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. श्रीनिवास यांनी फेब्रुवारी महिन्यात बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. धारावी पुनवर्सन प्रकल्पाचे विशेष कार्यकारी अधिकारी असलेल्या श्रीनिवास यांच्याकडे बेस्टची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. आधीच बेस्ट उपक्रमामध्ये येण्यास कोणीही अधिकारी उत्सूक नसताना आता हे पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.