Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का, मोठा नेता उपमुख्यमंत्र्यांच्या गटात जाण्याच्या तयारीत

Maharashtra Political News : शरद पवार गटातील मोठा नेता हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. शरद पवार गटातील नेत्यानेच याबाबत वक्तव्य केले आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On
Summary
  • शरद पवारांना मोठा धक्का बसणार?

  • राष्ट्रवादीतील मोठा नेता शिंदे गटात जाणार?

  • माजी आमदाराच्या वक्तव्याने मोठी खळबळ

Maharashtra : महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले होते. पण विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने सत्तेत बसवले. यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला. आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्ष तयारीला लागले आहेत. यादरम्यान आघाडीतील पक्षांना गळती लागल्याचे म्हटले जात आहेत. अनेक नेते, पदाधिकारी महायुतीत जात आहेत.

सलग ३ टर्म आमदार असलेले राहुल मोटे हे शरद पवार गटातून बाहेर पडत आहेत. ७ ऑगस्ट रोजी त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे म्हटले जात आहे. या धक्क्यानंतर आता शरद पवार गटातील आणखी एक नेता दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधन होण्याआधी लाडक्या बहिणींना झटका? महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते उत्तम जानकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत माजी नेते हनुमंत डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस वक्तव्य केले आहे. उत्तम जानकर यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले होते. यावरुन संकल्प डोळस यांनी जानकर यांच्यावर टीका केली. तेव्हा उत्तम जानकर हे शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत, असे संकल्प डोळस म्हणाले.

Maharashtra Politics
Mumbai Crime : धक्कादायक! ३७ वर्षीय क्रिकेट कोचकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार

उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे मोठे नेते आहे. त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर आंदोलन केले होते. त्यांनी बॅलेट मतदानाचा आग्रह देखील केला होता. सोलापूरमधील एका कार्यक्रमामध्ये उत्तम जानकर यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले होते. एकनाथ शिंदे हे कर्णानंतर दुसरे दानी व्यक्ती आहेत, त्यांच्यासारखा दिलदार माणूस पाहिला नाही, असे जानकर म्हणाले होते.

Maharashtra Politics
Actress Death : लोकप्रिय अभिनेत्रीचे निधन, अवघ्या ३३ व्या वर्षी जगाला निरोप; मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com