Ladki Bahin Yojana : रक्षाबंधन होण्याआधी लाडक्या बहिणींना झटका? महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ladki Bahin Yojana News : राज्यातील गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेशी संबंधित नवी माहिती समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanax
Published On
Summary
  • लाडकी बहीण योजनेसंबंधित मोठा निर्णय होणार

  • रक्षाबंधन होण्यापूर्वीच लाभार्थींना धक्का बसणार

  • सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष

महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांसाठी सुरु केली. गरजू महिलांना आर्थिक सहकार्य मिळावे यासाठीची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्या महिलांना योजनेसाठी अर्ज केला, अशा लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये दर महिन्याला १,५०० रुपये येतात. लाडकी बहीण योजनेशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. रक्षाबंधन होण्यापूर्वीच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना राखीपौर्णिमेआधी मोठा धक्का बसणार आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली, तेव्हा त्याबाबत ठराविक निकष ठरवण्यात आले होते. यानुसार अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार असे ठरले. याशिवाय ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही असेही ठरले होते.

Ladki Bahin Yojana
Mumbai Pune Accident : मुंबई-पुणे मार्गावर मृत्यूचा सापळा! वर्षभरात ९७ अपघात, सर्वाधिक अपघात कुठे?

वयाची मर्यादा असेलला निकष न जुमानता ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारी नोकरीत असलेल्या महिलांनीही योजनेत नाव नोंदवले आहे. याशिवाय तब्बल १४ हजार पुरुष देखील लाडकी बहीण योजनेमधून महिन्याला दीड हजार रुपये मिळवत आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana
Mumbai Crime : धक्कादायक! ३७ वर्षीय क्रिकेट कोचकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा अनधिकृतपणे लाभ घेणाऱ्यांवर लवकरच कारवाई होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून पंधरा दिवसांच्या आत खात्यांची माहिती मागवण्यात आली आहे. योजनेचा अनधिकृत पद्धतीने ज्या महिला दोषी आढळतील, त्यांच्याकडून पूर्ण रक्कम वसूल केली जाणार आहे. संबंधित दोषींवर गुन्हे दाखल होण्याचीही शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana
Actress Death : लोकप्रिय अभिनेत्रीचे निधन, अवघ्या ३३ व्या वर्षी जगाला निरोप; मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com