Gondia News Saamtv
महाराष्ट्र

Gondia News: गोंदिया लोकसभा लढवण्यास प्रफुल्ल पटेल सज्ज? होर्डिंगने वाढवली भाजप नेत्यांची चिंता

Gondia News: तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कुशल संघटक म्हणून गृहमंत्री अमित शाह यांना निवडणुकीतील विजयाचे श्रेय देणारे होर्डिंग लक्षवेधी ठरत आहे.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, गोंदिया|ता. ५ डिसेंबर २०२३

Gondia Political News:

नुकतेच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. यामध्ये छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले. या विजयाने त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्येही चांगलाच उत्साह वाढलाय.

राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर करणारे बॅनरही लावलेत. मात्र त्यांच्या या बॅनरमुळे भाजप नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या सविस्तर.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नुकत्याच तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) एकहाती सत्ता मिळाली. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारे फ्लेक्स गोंदियामध्ये झळकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कुशल संघटक म्हणून गृहमंत्री अमित शाह यांना निवडणुकीतील विजयाचे श्रेय देणारे होर्डिंग सध्या चर्चेत आणि लक्षवेधी ठरले आहेत.

खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचा नामोल्लेख असलेल्या होर्डिंग रामटेक- गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर लावाण्यात आले आहे. या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल यांचे छायाचित्र झळकत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रफुल्ल पटेल भंडारा- गोंदिया लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) लढण्यास सज्ज झाले की काय? अशा चर्चा रंगल्या असून भाजपा नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, तीन राज्यांमधील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.

त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप जास्तीत जास्त जागा लढवणार असून मित्रपक्षांना जास्त जागा देण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: हिवाळ्यात भाजलेले हरभरे खा; 'हे' आजार राहतील कोसो दूर

International Men's Day 2024: सावधान; 'या' आजारचे पुरुष ठरू शकतात बळी...

Mathira Viral Video: टिकटॉक स्टार इम्शा रहमानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक; व्हिडीओ होतोय व्हायरल

Maval Vidhan Sabha : मावळचा गड यंदा कोणाकडे?; महायुतीतील राष्ट्रवादीसोबत अपक्षांची झुंज, आघाडीही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी

Delhi Pollution: प्रदुषणामुळे दिल्लीत श्वास घेणंही कठीण ! AQI 500 पार, शाळा-महाविद्यालये ऑनलाईन, रेल्वे-विमानसेवा विस्कळीत 

SCROLL FOR NEXT