Cyclone Michaung: मिचौंग चक्रीवादळाने चेन्नईत जनजीवन विस्कळीत; आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू , ८ जिल्ह्यांना अलर्ट

Cyclone News: चेन्नईत चक्रीवादळामुळे हाहाकार माजला आहे. सर्वत्र पाणीचपाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. वादळामुळे शहरातील झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
Cyclone Michaung
Cyclone MichaungSaam TV

Chennai:

चेन्नईत चक्रीवादळामुळे हाहाकार माजला आहे. सर्वत्र पाणीचपाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. वादळामुळे शहरातील झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मिचौंग चक्रीवादळ आता वेगाने तामिळनाडू आणि आंध्र पदेशकडे सरकत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cyclone Michaung
Cyclone Michaung: येत्या ४८ तासांत बंगालच्या उपसागरात 'मायचॉन्ग' चक्रीवादळ धडकणार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

वादळामुळे (Cyclone) तामिळनाडूतील अनेक शहरांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्यात. आज (५ डिसेंबर) मंगळवारी चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. वादळ येणार असल्याने पूर्व किनारपट्टीवरील ८ जिल्हांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान अलेल्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याचा वेग आणखी वाढेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

आंध्र प्रदेशातील ८ जिल्ह्यांना अलर्ट

चेन्नईत (Chennai) सातत्याने मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे एकूण १२ उड्डाणे रद्द करण्यात आलीत. रस्ते वाहतूक देखील बंद करण्यात आली असून अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी नागरिकांना स्वत:ची काळजी घ्या तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असे आदेश दिलेत. तसेच आंध्र प्रदेशातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने तिरुपती, बापटला, कृष्णा, पश्चिम गोद, नेल्लोर, प्रकाशम या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केलाय.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफ देखील अलर्ट मोडवर आहे. एनडीआरएफच्या १८ टीम तैनात करण्यात आल्यात. तसेच १० अतिरिक्त पथके देखील बोलावण्यात आलीत. यासह किनारपट्टी भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

७ डिसेंबर रोजी, मिचॉन्ग वादळ पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर, झारग्राम, हुबळीसह, परगणा, कोलकाता, हावडा यासह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळाचे पडसाद उमटण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Cyclone Michaung
Kalyan Crime: झोप लागताच संधी साधली, रेल्वे अधिकाऱ्याचीच बॅग लांबवली; सराईत चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com