Kalyan Crime: झोप लागताच संधी साधली, रेल्वे अधिकाऱ्याचीच बॅग लांबवली; सराईत चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kalyan Latest News: झोप लागल्याचा फायदा घेत चोरट्याने ही बॅग लंपास केली. या बॅगेत महागडा लॅपटॉप दोन मोबाईल, दोन हार्ड डिस्क, रायटिंग पॅड आणि रोख रक्कमेसह अन्य कागदपत्रे होती.
Crime News:
Crime News: saam tv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. ४ डिसेंबर २०२३

Kalyan Crime News:

रेल्वे एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या रेल्वे विभागातील असिस्टंट जनरल मॅनेजरची बॅग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान घडला होता. या प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी अजय सरोगे या तरुणाला डोंबिवलीतून अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून बॅगेतील महत्वाच्या वस्तूही हस्तगत करण्यात आल्यात.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रेल्वेत एजीएम पदावर कार्यरत असलेले सांकेत कुमार मिश्रा हे ८ नोव्हेंबर रोजी ११०२० कोणार्क एक्सप्रेसमध्ये बोगी नंबर ए-१ मधून प्रवास करीत होते. यावेळी लोणावळा ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान त्यांचा डोळा लागला. याच संधीचा फायदा घेत त्यांच्या हातात असलेली बॅग घेऊन पोबारा गेला.

या बॅगेत महागडा लॅपटॉप दोन मोबाईल, दोन हार्ड डिस्क, रायटिंग पॅड आणि रोख रक्कमेसह अन्य कागदपत्रे होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्यानंतर रेल्वेचे डीसीपी मनोज पाटील, एसीपी आदिनाथ बुधवंत वरिष्ठ पोलिस निरिक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला गेला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crime News:
Shirdi News : पालकमंत्री विखे पाटलांनी उचलला जखमी वारकऱ्यांच्या उपचारांचा खर्च; मुख्यमंत्री सहायता निधीसाठीही प्रस्ताव

परिसरातील सिसिटिव्हीचा आधार घेत पोलिसांनी अजय सरोज याला अटक केली. पोलिसांनी अटक केलेला अजय हा डोंबिवलीतील अहिरे गावात राहतो. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अजयच्या विरोधात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. तो ट्रेनमध्ये अंटेंडण्ट असल्याचे सांगून फिरायचा आणि चोऱ्या करत असल्याचेही समोर आले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Crime News:
Mizoram Election Result: फक्त ५ वर्षापूर्वी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पक्षानं ६८ वर्ष जुन्या MNFला फोडला घाम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com