Mizoram Election Result: फक्त ५ वर्षापूर्वी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पक्षानं ६८ वर्ष जुन्या MNFला फोडला घाम

Zoram Peoples Movement: आज पूवोत्तर राज्य मिझोराम येथील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत झोरम पीपल्स मुव्हमेंटने (ZPM)एकहाती सत्ता मिळवलीय. एमएनएफला पराभवाची धूळ चारणारा ZPM हा कधी आला होता उदयास, हे जाणून घेऊ..
Zoram Peoples Movement
Zoram Peoples MovementSaam Tv
Published On

Zoram Peoples Movement History :

मिझोराम विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटला मोठा धक्का बसला. मिझो नॅशनल फ्रंट हा पक्ष १९५५ साली तयार झाली होती. मिझोरामच्या सत्तेत देखील हा पक्ष होता. परंतु या पक्षाला पाच वर्ष जुन्या पक्षाने घाम फोडला. (Latest News)

रविवारी देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाले. आज पूवोत्तर राज्य मिझोराम येथील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत झोरम पीपल्स मुव्हमेंटने (ZPM)एकहाती सत्ता मिळवलीय. तर राज्यातील ६८ वर्ष जुन्या एमएनएफला फक्त ९ जागा मिळाल्या आहेत. ६८ वर्ष झालेल्या एमएनएफला पराभवाची धूळ चालणारा पक्ष मोठ्या ताकदीचा असेल ना? पण नाही, राज्यातील इतक्या बलाढ्य आणि जुन्या पक्षाला घाम फोडणारा पक्ष हा फक्त पाच वर्षापूर्वी तयार झाला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०१८मध्ये तयार झाला पक्ष

ZPM ने २०१८ मध्ये पहिली निवडणूक लढवली होती, त्यातही जबरदस्त कामगिरी केली होती. २०१८ मध्ये दिलेल्या झुंजीवरून लक्षात आलं होतं की, हा पक्ष एमएनएफ(MNP) चा प्रतिस्पर्धी म्हणून तयार होणार असल्याचं लक्षात आलं होतं. या निवडणुकीत ZPM ८ जागा जिंकल्या होत्या आणि आज या पक्षाने तब्बल २७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवलीय.

दरम्यान यशाच्या या शिखरावर पोहोचताना झोरम पीपल्स मुव्हमेंट पक्षाला अनेक धक्के देखील सहन करावे लागले. २००८ तयार झालेल्या पक्षात असलेल्या मिझोराम पीपल्स कॉन्प्रेंसने वेगळी चूल मांडण्याचा निर्णय केला. ZPMने राजकीय पक्ष होण्याचा निर्णय घेतल्याने मिझोराम पीपल्स कॉन्प्रेंसने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०२० मध्ये ZPMच्या काही सदस्यांनी पक्षातून वेगळं जाण्याचा निर्णय घेतला. असे अनेक धक्के मिळाल्यानंतही ZPM च्या कामगिरीत कोणतीच कसर राहिली नाही.

कोण आहेत आहेत ZPMचे अध्यक्ष

ZPMचे अध्यक्ष लालडुहोमा आहेत, ते मिझोरामचे माजी आयपीएस अधिकारी आहेत. १९७२ ते १९७७ पर्यंत त्यांनी मिझोरामच्या मुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलं होतं. पदवीनंतर त्यांनी भारतीय नागरी सेवेची परीक्षा दिली. १९७७ मध्ये आयपीएस झाल्यानंतर त्यांनी गोव्यात स्क्वॉड लीडर म्हणून काम केले. कर्तव्यावर असताना त्यांनी तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. १९८२ मध्ये पोलीस उपायुक्तानंतर लालडुहोमा यांची पदोन्नती केल्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना सुरक्षा प्रभारी म्हणून नियुक्त केलं होतं. राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली १९८२ च्या आशियाई खेळांच्या आयोजन समितीचे ते सचिवही होते.

Zoram Peoples Movement
Mizoram Election Result 2023: ZPMची एकहाती सत्ता; मिझोराममध्येही भाजप काँग्रेसच्या पुढे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com