Kalyan News : इथं टाइमपास करायला आलोय का? विकासकामांची पाहणी करताना श्रीकांत शिंदेंनी अधिकाऱ्यांना झापलं

MP Shrikant Shinde : कल्याण-शीळ उड्डाणपुलाची तीन लेन 15 जानेवारी पर्यंत खुले केले जाणार असल्याचंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.
MP Shrikant Shinde
MP Shrikant ShindeSaam TV
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan News :

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आज सकाळपासून मतदारसंघातील विकास कामांचा पाहणी करत होते. यावेळी त्यांना परिसरातील महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला. दरम्यान त्यांनी विकासकामांवरुन अधिकाऱ्यांना फैलावर देखील धरलं.

खासदार श्रीकांत शिंदे आपल्या पाहणी दौऱ्यात कल्याण शीळ रोडची पाहणी केली. यावेळी तांत्रिक अडचणी आणि त्यावरील मार्ग इत्यादी विषयांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MP Shrikant Shinde
PM Modi in Sindhudurg: PM मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

पलावा जंक्शन येथील एक लेन फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आलं. कल्याण फाटा परीसरात रस्त्याची पाहणी करत रुंदीकरण, पाईपलाईनचे स्थलांतरण, बुलेट ट्रेन, एलिव्हटेड मार्ग या सर्व बाबी इथे जोडल्या जाणार असून वाहतूक कोंडी फुटणार असल्याचं सांगितलं.

कल्याण-शीळ उड्डाणपुलाची तीन लेन 15 जानेवारी पर्यंत खुले केले जाणार असल्याचंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. ऐरोली ते काटई एलिव्हेटेड मार्गावर एमएमआर रिजनमधील सर्वात मोठा बोगदा खोदण्यात आला आहे. यातील बेलापूर ते मुंब्रा वाय जंक्शन हा टप्पा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याचंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

MP Shrikant Shinde
Manoj Jarange News: गिरीश महाजनांनी मराठा समाजाला नडू नये; अन्यथा 'त्या' रेकॉर्डिंग व्हायरल करू, जरांगेंचा इशारा

खासदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना झापलं

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांनादेखील धारेवर धरलं. फेब्रुवारीपर्यंत दोन्ही लाईन सुरु करा, अशा सूचना एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.

कामाला होत असलेल्या दिरंगाईबाबत, किती वेळ घेणार अजून? टाईमपास करायला आलोय का? चांगले काम करणारे अधिकारी आणा, असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत फैलावर घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com