कल्याण डोंबिवली महापालिकेचा कारभार वादात, कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कर्मचारी गंभीर भाजला

Kalyan dombivli news : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कारभार वादात सापडला आहे. कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कर्मचारी भाजल्याचे समोर आलं आहे.
Kalyan dombivli news update
Kalyan dombivli news Saam tv
Published On

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर

केडीएमसीचे कचरा संकलनाचे कंत्राट असलेली सुमित एल्कोप्लास्ट कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनाबाबत हलगर्जीपणा कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतला

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. केडीएमसीच्या कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट असलेल्या सुमित एल्कोप्लास्ट खासगी कंपनीचा कारभार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत हलर्गजीपणामुळे काशीनाथ पारवे हा कंत्राटी कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

Kalyan dombivli news update
Fact Check : ड्राय डेलाही दारू मिळणार? ड्राय डेबद्दल सरकारने निर्णय बदलला?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीतील रोड स्वीपिंग मशीन साफ करताना संबंधित कर्मचाऱ्याचा पाय घसरल्याची घटना घडली. त्यावेळी काशीनाथ यांचा मशीनच्या सायलेन्सरवर पाय पडल्याने गंभीर भाजला.जखमी कर्मचाऱ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काशीनाथ यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या घटनेनंतर लोकनेते पुंडलीकशेठ म्हात्रे कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, कंपनीकडून कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य जसे की हातमोजे, सुरक्षात्मक बूट, उष्णतारोधक कपडे आदी पुरवले जात नाहीत. योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा संघटनेने केला आहे.

Kalyan dombivli news update
वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट; सात्यकी सावरकरांकडून अचानक तो अर्ज दाखल, कोर्टात नेमकं काय घडलं?

कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. केवळ निवेदन देऊन भागणार नाही. जर तातडीने कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. तत्पूर्वी, या प्रकरणी सुमित एल्कोप्लास्ट कंपनीकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.केडीएमसी प्रशासनाने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी व नागरिकांकडून होत आहे.

Kalyan dombivli news update
दिवसाढवळ्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; गोळीबाराचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद, VIDEO

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही अशा तक्रारी समोर आल्या होत्या. आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com