Shreya Maskar
बटाटा-टोमॅटोचे भरीत बनवण्यासाठी बटाटा, टोमॅटो, तेल, शेंगदाण्याचा कूट , लसूण, हिरवी मिरची, सुकी लाल मिरची, कांदा, कोथिंबीर, गरम मसाला, धणे पूड, जिरे, मीठ, लाल तिखट इत्यादी साहित्य लागते.
बटाटा-टोमॅटोचे भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटा सोलून छान उकडून घ्या. त्यानंतर ७-८ लसणाच्या पाकळ्या सोला. यामुळे पदार्थाची चव वाढेल.
त्यानंतर कांदे सोलून पातळ लांब तुकडे करा. तसेच हिरवी मिरची, सुकी लाल मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून यात लसूण, कांदा, हिरवी मिरची, सुकी लाल मिरची छान परतून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवा
दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल टाकून उकडलेले बटाट्याचे तुकडे आणि बिया काढलेला टोमॅटो टाकून चांगले खमंग परतून घ्या.
मॅश केलेले बटाटे- टोमॅटो तयार मसाल्यात टाकून चांगले मिक्स करा. मॅश करा. तुम्ही यात शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता. चव आणखी वाढेल.
सर्व मिश्रण एकत्र करून त्यात गरम मसाला, धणे पूड, जिरे, लाल तिखट आणि मीठ घालून चांगले मंद आचेवर परतून घ्या.
अशाप्रकारे चमचमीत बटाटा-टोमॅटोचे भरीत तयार झाले. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत याचा आस्वाद घ्या.