Holi Special Dahi Vada Recipe : होळीला नाश्त्यासाठी खास बनवा दही वडा, एकदा खाल तर खातच राहाल

Shreya Maskar

वड्यांचे साहित्य

वडे बनवण्यासाठी उडद डाळ, आलं, काळी मिरी पावडर, हिरव्या मिरच्या, पीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Dahi Vada | yandex

दह्याचे साहित्य

चटपटीत दही बनवण्यासाठी दही, लाल तिखट, भाजलेले आणि किसलेले जिरे, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, काळे मीठ इत्यादी साहित्य लागते.

Dahi Vada | yandex

गार्निशिंग

गार्निशिंग करण्यासाठी धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार इतर पदार्थ देखील टाकू शकता.

Dahi Vada | yandex

दही वडा

दही वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Dahi Vada | yandex

हिरव्या मिरच्या

डाळीच्या पेस्टमध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले, बेकिंग सोडा आणि मीठ घाला. सर्व मिश्रण मिक्स करून त्याचे छोटे छोटे वडे तळून घ्या.

Green Chillies | yandex

तेलात फ्राय करा

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात वडे खरपूस तळून घ्या. वडे खुसखुशीत गोल्डन फ्राय करा. एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात तळलेले वडे घाला. वडे मऊ झाल्यावर, ते तुमच्या तळहातांमध्ये दाबून पाणी पिळून घ्या.

Dahi Vada | yandex

चिंचेची चटणी

चटपटीत दही बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये दही, जिरे पावडर, लाल तिखट, काळे मीठ, चिंचेची चटणी, हिरवी चटणी आणि साधे मीठ एकत्र करा.

Tamarind Chutney | yandex

लाल तिखट

शेवटी दह्यात वडे घाला आणि चांगले मिक्स करा. त्यानंतर दह्यावर धणे, जिरे पावडर आणि लाल तिखट घालून गार्निशिंग करा.

Red chilli powder | yandex

NEXT : किचकट काम होईल सोपं, 10-12 गुजिया एकाच वेळी बनतील, फक्त वापरा 'ही' ट्रिक

Holi special Gujiya Recipe | yandex
येथे क्लिक करा...