Holi Special Gujiya Recipe : किचकट काम होईल सोपं, 10-12 गुजिया एकाच वेळी बनतील, फक्त वापरा 'ही' ट्रिक

Shreya Maskar

होळी 2026

यंदा 3 मार्चला होळी हा सण आला आहे. होळीला आवर्जून गुजिया बनवल्या जातात. सिंपल पद्धतीने गुजिया कशा बनवाव्या, जाणून घेऊयात.

Holi | yandex

गुजिया

गुजिया बनवण्यासाठी खवा, रवा, तूप, ड्रायफ्रुट्स, मैदा, पाणी, तेल, मीठ आणि गुलाब‌जल इत्यादी साहित्य लागते.

Gujiya | yandex

खवा

गुजिया बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅन गरम करून त्यात खवा परतून घ्या. खवा गोल्डन फ्राय झाल्यानंतर त्यात तूप घालून रवा भाजून घ्या.

Khawa | yandex

ड्रायफ्रुट्स

रवा खरपूस भाजल्यावर त्यात बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स काप टाका. त्यानंतर यात खवा मिक्स करा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात पिठीसाखर घाला.

Dry fruits | yandex

गुलाब पाणी

दुसरीकडे एका बाऊलमध्ये मैदा, तूप ,गुलाब पाणी आणि चवीनुसार मीठ घालून कणिक मळू‌न घ्या. कणिक जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Rose water | yandex

करंजी बनवा

पीठाचे छोटे गोळे करून त्याची पोळी लाटा आणि त्यात सारण भरा. त्यानंतर त्याला करंजीचा आकार द्या. करंजी नीट बंद करा, नाहीतर ती फुटेल.

Gujiya | yandex

तेलात फ्राय करा

शेवटी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात गुजिया गोल्डन फ्राय करा. गॅस मंद आचेवर ठेवून द्या. जेणेकरून गुजिया जळणार नाही.

Gujiya | yandex

ट्रिक

जर एक एक करंजी बनवायला जास्त वेळ लागत असेल तर ही ट्रिक फॉलो करा. एकच मोठी पोळी लाटा. त्यानंतर काठाकडेच्या बाजूला थोडे अंतर ठेवून गुजियाचे सारण टाका. त्यानंतर जिथे सारण टाकले आहे बाजू दुमडून घ्या. त्यावर वाटीने किंवा ग्लासने गुजिया कापा.

Gujiya | yandex

NEXT : कांद्याचे मुठे अन् गरमागरम भाकरी; रविवारचा गावरान बेत, वाचा सिंपल रेसिपी

Kandyache Muthe Recipe | yandex
येथे क्लिक करा...