Kandyache Muthe Recipe : कांद्याचे मुठे अन् गरमागरम भाकरी; रविवारचा गावरान बेत, वाचा सिंपल रेसिपी

Shreya Maskar

कांद्याचे मुठे

कांद्याचे मुठे बनवण्यासाठी कांद्याची पात, खोबरं, कांदा, आलं- लसूण पेस्ट, जिरे, कोथिंबीर, बेसन पीठ, तेल, तिखट, मीठ, हळद आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Kandyache Muthe | yandex

कांद्याची पात

कांद्याचे मुठे बनवण्यासाठी सर्वप्रथम हिरवी कांद्याची पात बारीक चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्या आलं, लसूण, जिरे आणि थोडं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.

Kandyache Muthe | yandex

कोथिंबीर

एका बाऊलमध्ये भिजवलेली तुरीची डाळ, आलं- लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कांद्याची पात मिक्स करा.

coriender | Yandex

बेसन पीठ

मिश्रण छान एकजीव झाल्यावर यात बेसनाचे पीठ, चवीनुसार मीठ, तिखट, हळद घालून घट्टसर मिश्रण तयार करा. यात कांद्याचे मिश्रण टाका.

Gram flour | yandex

कांद्याचे मुठे तयार

आता बेसनाच्या मिश्रणाचे छोटे छोटे मुठे बनवून कुकरमध्ये १० ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्या. तुम्ही हे तेलात देखील गोल्डन फ्राय करू शकता.

Kandyache Muthe | yandex

दालचिनी

गॅसवर सुकं खोबरं, भाजलेला कांदा गोल्डन परतून घ्या. यात वेलची, दालचिनी टाकून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करा.

Cinnamon | yandex

लसणाची पेस्ट

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांद्याची पेस्ट, लसणाची पेस्ट, खोबऱ्याचे वाटण घालून मिक्स करा. त्यानंतर यात हळद, तिखट, धणेपूड मिक्स करा.

Garlic paste | yandex

मसाले

तयार मिश्रणात कळा मसाला आणि मीठ घालून चांगले परतून घ्या. शेवटी यात पाणी, वाफवलेले मुठे घालून पुन्हा एक वाफ काढा. अशाप्रकारे कांद्याचे मुठे तयार झाले.

Spices | yandex

NEXT : ऑफिसमधून आल्यावर फक्त १० मिनिटांत बनवा दही भेंडी, रेस्टॉरंटसारखी चव येईल घरच्या जेवणाला

Dahi Bhindi Recipe | yandex
येथे क्लिक करा...