Dahi Bhindi Recipe : ऑफिसमधून आल्यावर फक्त १० मिनिटांत बनवा दही भेंडी, रेस्टॉरंटसारखी चव येईल घरच्या जेवणाला

Shreya Maskar

दही भेंडी

दही भेंडी ही प्रामुख्याने उत्तर भारत, राजस्थान आणि ओडिशामध्ये बनवली जाणारी एक लोकप्रिय, आंबट-तिखट डिश आहे. नेहमीची भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर दही भेंडी ट्राय करा.

Dahi Bhindi | yandex

साहित्य

दही भेंडी बनवण्यासाठी भेंडी, दही, कांदा, तिखट, काळी मिरी पावडर, मीठ, टोमॅटो, कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात छोटे बटाटे देखील टाकू शकता.

Dahi Bhindi | yandex

भेंडी

दही भेंडी बनवण्यासाठी सर्वात आधी भेंडी नीट धुवून स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर मध्ये बारीक चिरून घ्या. दही भेंडी बनवण्यासाठी तुम्ही छोटी भेंडी वापरा.

Bhindi | yandex

कांदा

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात भेंडी फ्राय करून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो परतून घ्या. २-३ मिनिटांनी गॅस बंद करा.

Onion | yandex

काळी मिरी पावडर

एका बाऊलमध्ये थंड दही चांगले फेटून घ्या. त्यात तिखट, काळी मिरी पावडर आणि मीठ घाला. त्यानंतर यात भेंडी घालून चांगले शिजवा. एक उकळी आल्यवर गॅस बंद करा.

Black pepper powder | yandex

चवदार मेन्यू

अशाप्रकारे दही भेंडी रेसिपी तयार आहे. तुम्ही चपाती किंवा भातासोबत याचा आस्वाद घ्या. चटपटीत दही भेंडी बनवण्यासाठी यात जास्तीचा मसाला टाका.

Dahi Bhindi | yandex

टीप १

दही भेंडी बनवताना दही फाटू नये म्हणून दही वापरण्यापूर्वी ते नीट फेटून घ्यावे. दही भाजीत टाकल्यावर सतत ढवळत राहू नका.

Dahi Bhindi | yandex

टीप २

दह्यामध्ये तुम्ही १-२ चमचे बेसन किंवा कॉर्नफ्लॉवर मिसळा. तसेच मसाल्यात दही टाकताना गॅस मंद आचेवर ठेवा.

Dahi Bhindi | yandex

NEXT : फोडणीच्या भाताला द्या हिरवागार तडका, १०-१५ मिनिटांत चटपटीत मटार पुलाव तयार

Matar Bhat Recipe | yandex
येथे क्लिक करा...