Matar Bhat Recipe : फोडणीच्या भाताला द्या हिरवागार तडका, १०-१५ मिनिटांत चटपटीत मटार पुलाव तयार

Shreya Maskar

मटार भात

मटार भात किंवा पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ, हिरवे मटार, कांदा, टोमॅटो, तेल, हिरव्या भाज्या, पनीर, मका इत्यादी साहित्य लागते.

Matar Bhat | yandex

मसाले

हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, खडे मसाले, हळद, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी मसाले लागतात.

spices | yandex

तांदूळ

मटार भात बनवण्यासाठी सर्वप्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुवून १५-२० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर तांदूळ ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.

Rice | yandex

खडे मसाले

पॅनमध्ये तूप गरम करून त्यात खडे मसाले टाकून फोडणी द्या. खडे मसाल्यांना सुगंध आणि तेल सुटू लागल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो हलका गुलाबी होईपर्यंत परतावा.

spices | yandex

हिरवी मिरची

त्यानंतर हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हिरवे मटार घालून मध्यम आचेवर परतवा. तुम्ही यात बटाट्याचे छोटे काप देखील टाकू शकता.

Green chilies | yandex

मीठ

त्यानंतर हळद, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करा. यात भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने मिक्स करा. त्यावर 2 कप पाणी घाला.

Salt | yandex

पनीर

आता १०-१५ मिनिटे भात चांगला शिजवून घ्या. यात तुम्ही काजू, पनीर आणि हिगव्यागार भाज्या टाकू शकता. काजू पुलावमध्ये टाकण्याआधी तुपात परतून घ्या.

Paneer | yandex

रायता

दही, काकडीची कोशिंबीर, लोणचे, पापडसोबत गरमागरम, चटपटीत मटार भात किंवा पुलावाचा आस्वाद घ्या. तुमचे पोट भरेल.

Matar Bhat | yandex

NEXT :  १०-१५ दिवस छान टिकतील असे मूग डाळीचे लाडू, जेवल्यानंतर खायला हेल्दी स्वीट डिश

Moong Dal Laddu Recipe | yandex
येथे क्लिक करा...