Shreya Maskar
मूग डाळीचे लाडू बनवण्यासाठी मूग डाळ, तूप, पिठीसाखर, दूध, वेलची पूड आणि सुकामेवा इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात केशर देखील टाकू शकता.
मूग डाळ लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम मूग डाळ स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्यावी. जेणेकरून लाडू जास्त दिवस चांगले फ्रेश राहतील.
त्यानंतर मूग डाळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. पावडर जास्त बारीक आणि जाड होणार नाही, याची काळजी घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात डाळीचे पीठ मध्यम आचेवर खमंग, ग्रोल्डन फ्राय करा. पीठ पॅनला चिकटणार नाही, याची काळजी घ्या.
पीठ भाजून झाल्यावर त्यात कोमट दूध मिक्स करा. यामुळे लाडू दाणेदार होतात. त्यानंतर गॅस बंद करा.
मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर किंवा गूळ मिक्स करा. गूळ टाकल्यास लाडूला आणखी चव येते. त्यानंतर मिश्रणात वेलची पूड टाका.
शेवटी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाका. ड्रायफ्रूट्स बारीक करून तुपात भाजून घ्या. त्यानंतर हाताला तूप लावून लाडू वळून घ्या.
अशाप्रकारे बनवलेले लाडू १०-१५ दिवस हवाबंद डब्यात चांगले राहतात. तुम्ही लाडू फ्रिजमध्ये ठेवू शकता.