Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्याला रोज रोज उपमा आणि पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ब्रेड उपमा नक्की ट्राय करा. ही रेसिपी फक्त १० मिनिटांत बनेल.
ब्रेड उपमा बनवण्यासाठी ब्रेड स्लाइस, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मोहरी, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर, लिंबू इत्यादी साहित्य लागते.
ब्रेड उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्रेड हलके गरम करून त्याचे छोटे तुकडे करा. काळजी घ्या की ब्रेड जळणार नाही. नाहीतर उपम्यला कडू चव येईल.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि कांदा घालून हलके सोनेरी होईपर्यंत परता.
त्यानंतर फोडणीत बारीक चिरलेला टोमॅटो घालून एक मिनिटे मऊ होईपर्यंत शिजू द्या. यात हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्स करा.
आता यात ब्रेडचे छोटे-पातळ तुकडे घालून हलक्या हाताने परतून घ्या. सर्व मसाले ब्रेडला लागले पाहिजेत. जेणेकरून रेसिपीचा स्वाद आणखी वाढेल.
वरून हिरवीगार कोथिंबीर घाला आणि लिंबूचा रस पिळा. नाश्त्याला गरमागरम ब्रेड उपम्याचा आस्वाद घ्या.
तुम्ही उपम्याची चव वाढवण्यासाठी यात शेंगदाणे, मटार आणि मका देखील घालू शकता. तसेच वरून बारीक शेव देखील टाकू शकता.