Poha Cutlet Recipe : पोहे खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा कटलेट, सकाळी होईल पोटभर नाश्ता

Shreya Maskar

पोहा कटलेट

गाजर-पोहा कटलेट बनवण्यासाठी बटाटे, गाजर, पोहे, मटार, कोथिंबीर, शेवया, गव्हाचे पीठ, मसाले, लिंबाचा रस, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Poha Cutlet | yandex

गाजर

गाजर-पोहा कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये बटाटे, गाजर आणि मटार उकडून घ्या. कुकरच्या ३-४ शिट्ट्या काढा.

Carrot | yandex

पोहे

त्यानंतर 10 मिनिटे पोहे पाण्यात भिजत ठेवा. एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे, गाजर आणि मटार चांगले मॅश करून घ्या.

Poha | yandex

कोथिंबीर

मॅश केलेल्या मिश्रणात भिजवलेले पोहे आणि कोथिंबीर घाला. तुम्ही यात तुमच्या आवडीचे पदार्थ देखील टाकू शकता. उदा चीज, शेंगदाणे

Coriander | yandex

मसाले

त्यानंतर यात सर्व मसाले टाका. (धने पूड, जिरे पूड, चाट मसाला, लाल तिखट, लिंबाचा रस, इतर) मसाले मिक्स झाल्यावर चवीनुसार मीठ टाका.

Spices | yandex

चटपटीत कटलेट

आता या मिश्रणात पाणी टाकून कणिक मळून घ्या. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्याला कटलेटचा आकार द्या. जास्त जाड कटलेट बनवू नका.

Poha Cutlet | yandex

शेवया

शे‌वटी सगळे कटलेट्स शेवयांमध्ये कोट करा आणि तेलात खरपूस तळा. गोल्डन फ्राय झाले की पोहा कटलेट काढून घ्या.

Vermicelli | yandex

पुदिना चटणी

कुरकुरीत कटलेट्स चटपटीत पुदिना चटणी , तसेच सॉससोबत खा. सकाळी आणि संध्याकाळी नाश्त्यासाठी ही भन्नाट रेसिपी आहे.

Mint Chutney | yandex

NEXT : लहान मुलांसाठी घरीच बनवा ड्रायफ्रूट चॉकलेट्स, वाचा कमी खर्चात होणारी हेल्दी रेसिपी

Dry Fruit Chocolate Recipe | yandex
येथे क्लिक करा...