Dry Fruit Chocolate Recipe : लहान मुलांसाठी घरीच बनवा ड्रायफ्रूट चॉकलेट्स, वाचा कमी खर्चात होणारी हेल्दी रेसिपी

Shreya Maskar

ड्रायफ्रूट चॉकलेट

ड्रायफ्रूट चॉकलेट्स बनवण्यासाठी बदाम, मखाणे, काजू, मनुका, खजूर, मेल्टेड चॉकलेट, पिस्ता इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात आवडीचे इतर पदार्थ देखील टाकू शकता.

Dry Fruit Chocolate | yandex

ड्रायफ्रूट

ड्रायफ्रूट चॉकलेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये बदाम, मखाणे, काजू, पिस्ता हे सर्व ड्रायफ्रूट्स कोरडे भाजून घ्यावेत. सुकामेवा भाजताना गॅस कमी आचेवर ठेवा.

Dry Fruit | yandex

मखाणे

बदाम, मखाणे, काजू आणि पिस्ता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्या. आता या मिश्रणात पुन्हा बिया, खजूर आणि मनुका घालून पुन्हा वाटून घ्या.

Makhane | yandex

चॉकलेट मोल्ड्स

आता चॉकलेट मोल्ड्स मध्ये तयार मिश्रण भरपूर भरा. त्यावर आवडीनुसार काजू, पिस्ता आणि बदाम टाका.

Chocolate | yandex

चॉकलेट

चॉकलेट मोल्ड ३ ते ५ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून चॉकलेट व्यवस्थित सेट करून घ्यावे. चॉकलेट सेट झाल्यावर मेल्टेड चॉकलेटमध्ये बुडवून व्यवस्थित चारही बाजूने कोट करून घ्यावे.

Chocolate Recipe | yandex

चॉकलेट सेट करा

आता पुन्हा ३-४ तास चॉकलेट सेट करायला ठेवून द्या. त्यानंतर हेल्दी ड्रायफ्रूट चॉकलेट्सचा आस्वाद घ्या. तुम्ही हे चॉकलेट्स हवाबंद डब्यात जास्त वेळे भरून ठेवू शकता.

Dry Fruit Chocolate | yandex

ड्रायफ्रूट्स फायदे

ड्रायफ्रूट्समध्ये पोषण, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि हेल्दी फॅट्सचा खजिना आहेत. ड्रायफ्रूट्स शरीराला ऊर्जा देतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, मेंदूची कार्यक्षमता सुधारतात, पचनक्रिया सुधारतात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Dry Fruit Chocolate | yandex

डार्क चॉकलेट फायदे

डार्क चॉकलेट्समध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि मूड फ्रेश ठेवण्यास मदत करतात. ते मेंदूची कार्यक्षमता वाढवून नैराश्य कमी करते.

Dry Fruit Chocolate | yandex

NEXT : 30 दिवसांत पोटाची ढेरी होईल गायब, डाएटसोबत नियमित प्या 'हा' ज्यूस

Weight Loss Juice | saam tv
येथे क्लिक करा...