Shreya Maskar
रोजच्या धावपळीमुळे, जंक फूडमुळे तुमचे वजन दिवसेंदिवस अधिक वाढत जात असेल तर आहारात डाएटचा समावेश करा. तसेच रोज सकाळी न विसरता बीटरूटचा ज्यूस प्या.
बीटरूट मध्ये कॅलरीज कमी, फायबर जास्त असल्याने ते वजन कमी करण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे.
बीटरूटमुळे चयापचय सुधारते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि व्यायामाची क्षमता वाढवून चरबी कमी करण्यास मदत करते.
बीटरूटचा ज्यूस बनवण्यासाठी बीटरूट, आवळा, आलं, पुदिन्याची पाने, जिरे पावडर, काळे मीठ, लिंबाचा रस, मध आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
बीटरूटचा ज्यूस बनवण्यासाठी मिक्सरमध्ये बीटरूट, आवळा, आलं आणि पुदिन्याची पाने घालून एक पेस्ट बनवा. प्युरी जास्त गुळगुळीत करा.
त्यानंतर सर्व मिश्रण गाळून घ्या आणि बाऊलमध्ये काढा. यात पाणी, भाजलेले जिरे पूड, काळे मीठ, लिंबाचा रस, मध घालून मिक्स करा.
तयार ज्यूज एका ग्लासामध्ये काढून त्यात वरून तुम्हाला आवडत असेल तर बारीक बीटाचे तुकडे टाका आणि प्या.
बीटमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण असले तरी, त्याचा ग्लायसेमिक भार कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.