Shreya Maskar
यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रविवारी आली आहे. त्यामुळे उपवासाला खाण्यासाठी झटपट बटाटा पुरी बनवा. सिंपल रेसिपी लिहून घ्या.
बटाटा पुरी बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, साबुदाण्याचे पीठ, हिरवी मिरची, आलं, जिरे, धणे-जिरे पूड , मीठ, कोथिंबीर, तेल इत्यादी साहित्य लागते.
बटाटा पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे नीट मॅश करून घ्या. त्यात हिरवी मिरची, आले, जिरे , धणे-जिरे पूड आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा.
या मिश्रणात साबुदाण्याचे पीठ घालून मऊ कणिक मळा. पीठ जास्त घट्ट किंवा सैल होणार नाही याची काळजी घ्या. पीठानुसार हळूहळू मिश्रणात पाणी टाका.
१० -१५ मिनिटे कणिक बाजूला ठेवून द्या. त्यानंतर पीठाचे लहान लहान गोळे करून पुऱ्या लाटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून पुऱ्या गोल्डन फ्राय करा. लक्षात ठेवा पुऱ्या तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या. जेणेकरून पुऱ्या जळणार नाही.
गरमागरम बटाटा पुरी तुम्ही उपवासाला भगरसोबत खा. तसेच बाकी कधीही तुम्ही ती पुदिना चटणी , सॉससोबत खाऊ शकता.
गरम बटाटे मॅश करू नये. नाहीतर पीठ चिकट होते आणि पुरी लाटताना अडचण येते. पुरी पोळपाटाला चिकटते.