Dahisar Pipeline Damage: मेट्रो कामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

Mumbai Pipeline Damage: आज सकाळी मेट्रोचे काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली. यामध्ये लाखो लिटर पाणी वाया गेले. वाहून गेलेले पाणी दहिसर भागातील सबवे परिसरात साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे.
Dahisar Pipeline Damage:  मेट्रो कामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
Published On

संजय गडदे

Dahisar News:

मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील वेरावल्ली जलाशयाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता दहिसर पूर्वेकडील टोलनाका परिसरात पश्चिम दृत्तगती महामार्गाजवळ महापालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याचे प्रकरण समोर आलं आहे. मेट्रोचे काम सुरू असल्याने या ठिकाणी पाईपलाईन फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

Dahisar Pipeline Damage:  मेट्रो कामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
Thane Water Cut: ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा! कधी आणि कोणत्या भागात पाणीपुरवठा राहणार बंद? वाचा डिटेल्स

आज सकाळी मेट्रोचे (Metro) काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली. यामध्ये लाखो लिटर पाणी (Water) वाया गेले. वाहून गेलेले पाणी दहिसर भागातील सबवे परिसरात साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. परिसरात पाणी साचल्याने येथे काही प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. साचलेल्या पाण्यातून नागरिकांना कसरत करून वाट काढावी लागत आहे.

फुटलेल्या पाईपलाईनची दुरूस्ती करण्यासाठी जल अभियंता विभाग तेथे दाखल झाले आहे. तसेच दुरूस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. याआधी मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील वेरावल्ली जलाशयाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली आहे. सदर घटनेत अथक प्रयत्नांनी ही जिलवाहिनी दुरूस्त करण्यात आली होती.

एकीकडे काही दुष्काळी भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागेतय. तर दुसरीकडे अशा पद्धतीने पाणी वाया जात आहे. यामुळे येथील काही नागरिकांनी पाईपलाईन फुटण्याच्या घटनांवर संतापही व्यक्त केलाय.

Dahisar Pipeline Damage:  मेट्रो कामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
Telangana AP Water Problem: तेलंगणा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशचा 'नागार्जुन सागर'वर कब्जा; ७०० पोलिसांनी टाकली धाड, दोन्ही राज्यामध्ये तणाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com