Narendra Modi: हताश-निराश असाल, पण पराभवाचा राग सभागृहात काढू नका; PM मोदींचा विरोधकांना चिमटा

Parliament Winter Session, PM Narendra Modi Speech: संसदेचे हिवाळी अधिवेशन आज, सोमवारपासून सुरू होत असून, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विधानसभा निवडणूक निकालावरून मोदींनी विरोधकांना चिमटा काढला.
Parliament Winter Session, PM Narendra Modi Speech/ANI
Parliament Winter Session, PM Narendra Modi Speech/ANISAAM TV
Published On

Narendra Modi speech before Parliament Winter Session :

संसदेचे हिवाळी अधिवेशन आज, सोमवारपासून सुरू होत असून, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावरून विरोधकांना जोरदार टोला लगावला. थंडी विलंबाने सुरू झाली आहे. मात्र, राजकीय वातावरण तापले आहे. पराभवाचा राग सभागृहात काढू नका, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना चिमटा काढला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावर मोदींनी भाष्य केले. थंडी धीम्या गतीने सुरू झालेली आहे. पण राजकीय गरमी वेगाने वाढत आहे. चार राज्यांचे विधानसभा निवडणूक निकाल उत्साह वाढवणारे आहेत, असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाने नकारात्मकतेला पूर्णपणे नाकारले आहे. त्यामुळे विरोधकांना आवाहन करतो की नकारात्मकता सोडून सकारात्मकतेने सभागृहात यावे. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू द्या.

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होते. यावेळीही झाली. लोकशाहीचे हे मंदिर जनतेच्या आशा-आकांक्षा आणि विकसित भारत करण्यासाठी व्यासपीठ आहे. सर्वांनी येथे येताना पूर्ण तयारीनिशी यावे आणि उत्तम सूचना कराव्यात, असे आवाहन मोदींनी केले.

विरोधकांना टोला

थंडी खूपच धिम्या गतीने सुरू आहे. पण राजकीय गरमी वेगाने वाढत आहे. देशानं नकारात्मकतेला नाकारलंय. विरोधकांसाठी चांगली संधी आहे. पराभवाचा राग काढण्यापेक्षा सकारात्मकतेसह यावे. प्रत्येकाकडे संधी आहे. हताश-निराश असाल,पण पराभवाचा राग सभागृहात काढू नका, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. विरोधासाठी विरोधाच्या पद्धतीचा विचार करा. जो द्वेष निर्माण झाला आहे, कदाचित त्याचे प्रेमात रुपांतर होऊ शकतं, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com