Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यभर हुडहुडी! पुण्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी, इतर ठिकाणी आज कसं आहे तापमान?

IMD Alert: राज्यातील पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडार या जिल्ह्यातील तापमानाचा पारा १० अंशाजवळ आला आहे.

Priya More

राज्यामध्ये थंडीची लाट पसरली असून तापमानामध्ये चांगलीच घट झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील किमान तापमानात घट झाल्यामुळे चांगलीच थंडी पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. राज्यभरामध्ये सगळीकडे शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईकर देखील गुलाबी थंडीची मजा घेत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा १० च्या जवळपास पोहचला आहे. पुण्यामध्ये तर महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान झाले आहे. त्यामुळे पुणेकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.

राज्यातील पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडार या जिल्ह्यातील तापमानाचा पारा १० अंशाजवळ आला आहे. पुण्यातील तापमान ९ अंश सेल्सिअसवर आले आहे. पुणेकर सध्या पुणे, महाबळेश्वर आणि लोणावळ्यातील थंडीप्रमाणे थंडीचा अनुभव घेत आहेत. तर अहमदनगर, नाशिकमधील निफाड आणि जळगाव या जिल्ह्यात खूपच कमी तापमानाची नोंद झाली आहे. थंडी वाढल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी धुक्यांची चादर पसरली आहे.

नाशिक, लातूर आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत चालला आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागात थंडी वाढल्याने, नागरिक उबदार कपड्यांना पसंती देताना पाहायला मिळत आहेत. तर अनेक ठिकाणी शेकोट्या देखील पेटल्या आहेत. तर पुढच्या आणखीन काही दिवसांमध्ये गारठा वाढणार असल्याची माहिती देखील हवामान विभागकडून देण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण-पश्चिम क्षेत्रामध्ये अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या कमी दाबाच्या प्रभावामुळे दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.या राज्यांना हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर याचा परिणाम म्हणून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाज बांधवाची आत्महत्या

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मुळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

SCROLL FOR NEXT