Pune Election Results: पुणे जिल्ह्यातून ४ नव्या आमदारांचे चेहरे; 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

Pune Election Results Updates: पुणे जिल्‍ह्यात तीन माजी आमदारांना पुन्‍हा विधानसभेची संधी मिळालीये. जिल्ह्यात 21 पैकी 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाल्याचं चित्र आहे.
Maharashtra Election Result
Maharashtra Election Result Saam tv
Published On

Pune Assembly Election Results: राज्यात विधानसभा निवडणूकांचा निकाल अखेर लागला आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असून आज शपथविधी होणार आहे. अशातच पुणे जिल्ह्यात आमदारांमध्ये चार नवीन चेहरे समोर आले आहेत. याशिवाय जिल्‍ह्यात तीन माजी आमदारांना पुन्‍हा विधानसभेची संधी मिळालीये. जिल्ह्यात 21 पैकी 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाल्याचं चित्र आहे.

Maharashtra Election Result
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची लॉटरी! आता १५०० नाही तर २१०० रुपये मिळणार हप्ता; कधीपासून? जाणून घ्या

नव्‍या चार चेहऱ्यांमध्ये कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने, खेडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे, शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माउली कटके, भोरमध्ये शंकर मांडेकर यांचा समावेश आहे.

Maharashtra Election Result
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय, तर महाविकास आघाडीला मोठा फटका

माजी आमदार असलेले जुन्नरमधून अपक्ष शरद सोनवणे, पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

Maharashtra Election Result
Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

माजी आमदार असलेले जुन्नरमधून अपक्ष शरद सोनवणे, पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

पुण्यातही भाजप सर्वात मोठा पक्ष

पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.पुण्यात 21 पैकी नऊ जागा त्यांनी जिंकल्या आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण ८ जागा मिळाल्या आहेत.

Maharashtra Election Result
Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खेडमध्ये बाबाजी काळे यांच्यामुळे केवळ एक जागा मिळालीये. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला वडगाव शेरीमध्ये बापूसाहेब पठारे, त्याचबरोबर शिवसेनेचे विजय शिवतारे हे पुरंदरमधून, तर जुन्नरमध्ये शरद सोनवणे हे अपक्ष विजयी झाले आहेत.

जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा भोपळा

मावळत्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे जिल्ह्यातून तीन आमदार होते. संग्राम थोपटे, संजय जगताप आणि रवींद्र धंगेकर या काँग्रेसच्या तीनही आमदारांना या निवडणूकीमध्ये पराभव पत्करावा लागला. त्याचप्रमाणे एका अपक्षाबरोबर शिंदे गटाचा देखील पुणे जिल्ह्यात एक आमदार निवडून आला आहे.

Maharashtra Election Result
Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

सात विद्यमानांना पराभवाचा धक्‍का

मुख्य म्हणजे जिल्ह्यातील एकूण ७ विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे अतुल बेनके, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे, काँग्रेसचे भोरमधील संग्राम थोपटे , खेडचे दिलीप मोहिते आणि पुरंदर मधील संजय जगताप त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे अशोक पवार आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे पराभूत झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com