महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं. महाविकास आघाडीला 50 चा आकडा देखील गाठता आलेला नाही. वरकरणी हा निकाल मविआची सुमार कामगिरी दर्शवणार असला तरी मविआचं आगामी राजकारण आणि नेत्यांचं राजकीय करिअरच धोक्यात आणणारा आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला. उलटपक्षी महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. महाविकास आघाडीला 50 चा आकडा देखील गाठता आलेला नाही. वरकरणी हा निकाल मविआची सुमार कामगिरी दर्शवणार असला तरी मविआच्या आगामी राजकारणावर अन् नेत्यांचं राजकीय करिअरच धोक्यात आणणारा आहे. कारण सुमार कामगिरीचा फटका थेट खासदारांना बसणार असल्याचं चित्र आहे. कसा ते समजून घेऊ. महाविकास आघाडीला केवळ 49 जागा जिंकता आल्या. महाविकास आघाडीच्या या अपयशामुळे शरद पवार, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची पुढील राज्यसभा टर्म देखील मिळणार नाही. कारण,
-महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठी सामान्यपणे 43 चा कोटा निर्धारित
-ठाकरे गट 20,काँग्रेसच्या 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस + मित्रपक्ष मिळून अवघ्या 14 जागा असून एकूण 49 जागा आहेत.
- मविआतून मिळून एक राज्यसभा सदस्य निवडून आणता येईल.
- मविआत एका नावावर सहमती झाल्यास हे शक्य
- शरद पवारांच्या जागेवरही पवारांच्या राष्ट्रवादीतून राज्यसभेवर पाठवणं अशक्य
मुळात एकसंध नसलेल्या मविआला विधानसभेत जबर फटका बसला. त्यामुळे विधानसभेत मविआ विरोधालाही उरलेली नाही. मविआवर ओढावलेल्या या नामुष्कीमुळे विधानसभेतील संख्याबळावर राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेणाऱ्या वाचाळविरांना आता केवळ पक्षातील नेते पदावरच समाधान मानाव लागणार असं चित्रय. त्यातून महाराष्ट्राचं पुरोगामी राजकारण ढवळून निघणार यात शंका नाही.
विधानसभा निवडणूकीत महायुतीनं केलेल्या जबरदस्त कामगिरीनं मविआला विरोधी पक्षनेताही मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालीये. परंतू आता सेना राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदारही बंडाळी करणार असा दावा महायुतीच्या नेत्यांनी केलाय. पाहुया राज्यात पुन्हा होणार का बंडाळी ठाकरे-पवारांचा पक्ष फूटणार?
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी ठाकरे आणि पवारांचं टेन्शन पुढा वाढवलंय. विधानसभेच्या निवडणूकीत ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 20 जागांवर यश मिळालं असून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागा राखता आल्या. या धक्कादायक निकालानंतर निवडून आलेले आमदार आमच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट महायुतीच्या नेत्यांनी केलाय.
शिवसेना राष्ट्रवादी फुटल्यानंतर झालेल्या या पहिल्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला जनतेनं स्पष्ट नाकारलं. त्यामुळे या दोन्ही गटात अस्वस्थता आहे असल्याचं बोललं जातंय. 2022 ला शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदारांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हा आता राजकीय ओळख आणि अस्तित्व टिकवण्यासाठी निवडून आलेल्या आमदारांना टिकवून ठेवण्याची कसोटी दोन्ही नेतृत्वांची आहे. कारण महापालिका निवडणूकीच्या तोंडावर जर पुन्हा ठाकरे आणि पवारांच्या आमदारांनी बंडाळी केली तर ठाकरे गट आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
विधानसभा निकालात महायुतीला अभूतपुर्व यश मिळाल्याने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली आहे. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत 5 फॅक्टर महत्त्वाचे ठरणार आहेत. हे पाच फॅक्टर कोणते आहेत? विधानसभेच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याचीच आता महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. तर भाजपने फडणवीसांना तर शिंदे गटाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केलीय. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. भाजप आणि शिंदे गटानेही मुख्यमंत्रीपदावर दावा केलाय. मात्र मुख्यमंत्री ठरवण्यासाठी 5 फॅक्टर महत्वाचे ठरणार आहेत. हे 5 फॅक्टर कोणते आहेत?
-भाजपची रेकॉर्डब्रेक कामगिरी आणि फडणवीसांना पक्षांतर्गत नसलेला विरोध
-संघही फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अनुकूल
-शिंदेंना मिळालेलं जनमत आणि मराठा चेहरा
-भाजपच्या धक्कातंत्रानुसार शिंदे आणि फडणवीसांऐवजी दादांना संधी मिळण्याची शक्यता
-मध्य प्रदेश, राजस्थान प्रमाणे महाराष्ट्रातही नव्या चेहऱ्याला लॉटरी लागण्याची शक्यता
महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निकालानंतर ठरवणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता मुख्यमंत्रिपदासाठी तिन्ही पक्षातील नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे भाजपचे दिल्लीश्वर जुन्याच चेहऱ्यांना संधी देणार की धक्कातंत्र वापरुन नवी खेळी करणार? याकडे लक्ष लागलं आहे.
विधानसभेत महायुतीला मिळालेल्या यशामागे आरएसएस असल्याची चर्चा रंगलीय. मात्र आरएसएसने हे कसं शक्य केलंय? आरएसएसची रणनीती काय होती? विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला 230 इतक्या विक्रमी जागा मिळाल्या. त्यात भाजपला 132, शिंदे गटाला 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. त्यामुळे महायुतीच्या बंपर विजयाची देशभर चर्चा रंगलीय.. मात्र या विजयाचा पाया रचण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचं म्हटलं जातंय. त्याची कारणं काय आहेत?
-संघाची ताकद, महायुतीचा विजय
-लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेसाठी संघ आणि भाजपमध्ये समन्वय
-संघाने भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत सल्लामसलत केली
-मतदानवाढीसाठी संघाने शत-प्रतिशत मतदान मोहीम राबवली
-संघ स्वयंसेवकांकडून भाजपचं नाव न घेता अप्रत्यक्ष मतदानाचं आवाहन
-मायक्रो ओबीसींचे 330 मेळावे घेऊन वातावरण निर्मिती
-धर्म आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून अर्थशक्तीचा प्रयोग
-मविआचं नॅरेटिव्ह रोखण्यासाठी संघाकडून विशेष रणनीतीचा वापर
भाजपला संघाची गरज नसल्याचं वक्तव्य भाजप अध्यक्ष जे पी नड्डांनी केलं होतं. मात्र हे वक्तव्य संघ स्वयंसेवकांच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे सावध झालेल्या भाजपने संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत नवी रणनीती आखली आणि त्यामुळेच भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्याची चर्चा आहे.
राज्यात मनसे आणि वंचितचा पुरता सुपडासाफ झालाय. निवडणूकीत मनसेला आणि वंचितला उतरती कळा लागल्याच या निकालांनी दाखवलंय. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात वंचित आणि मनसेचा पुरता सुपडासाफ झालाय. या निवडणूकीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला तर वंचितची पाटी कोरी राहिलीये. या निवडणूकीत मनसेनं १२५ उमेदवार उभे करुनही मनसेला पुरतं अपयश आलं तर वंचितनं 200 उमेदवार उभे करुन सत्तेत सामिल होण्याचं स्वप्न पाहिलं परंतू त्यांच्या या स्वप्नाची दलित-मुस्लिम-ओबीसींनी पुरती धुळधाण केली.
विधानसभेत मनसेची कामगिरी
2019
100 उमेदवार रिंगणात
व्होट शेअर- 2.25%
1 आमदार विजयी
2024
125 उमेदवार रिंगणात
व्होट शेअर -1.58
एकही जागा नाही
2019ला एक आमदाराचा पक्ष असलेला मनसे 2024ला भोपळाही फोडू शकला नाही. तर आता 2019ला लाखोंची मत घेणाऱ्या वंचितच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.
विधानसभेत वंचितची कामगिरी
2019
243 उमेदवार रिंगणात
एकुण 25 लाख 23 हजार 583 मतं
सर्व उमेदवार पराभूत
2024
200 उमेदवार रिंगणात
एकुण 14 लाख इतकं मताधिक्य
सर्व उमेदवार पराभूत
राज ठाकरेंची धरसोड भूमिका आणि प्रकाश आंबेडकरांची जागावाटपापासून हेकेखोर पवित्र्यामुळे त्यांना मतदारांपासून कोसो दूर नेऊन ठेवलं. त्यामुळे सत्तेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आंबेडकर आणि ठाकरेंच्या उमेदवारांना जनतेनं थेट 4 आणि 5 व्या क्रमांकाची मतं दिलीय. त्यामुळे पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर पाडापाडीचं राजकारण आणि धरसोड वृत्ती सोडण्याची गरज या दोन्ही पक्षांना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.