Chhagan Bhujbal : सकाळी नांदगाव, दुपारी येवला; नाशिक तापलं, छगन भुजबळांना स्थानिकांनीच रोखलं,VIDEO

Chhagan Bhujbal News : नाशिकमध्ये मतदान केंद्रावर स्थानिकांनी छगन भुजबळ यांना रोखलं. त्यानंतर छगन भुजबळ आणि स्थानिकांसोबत बाचाबाची झाली.
 सकाळी नांदगाव, दुपारी येवला; नाशिक तापलं, छगन भुजबळांना स्थानिकांनीच रोखलं
Chhagan Bhujbal Google
Published On

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात लगबग सुरु आहे. राज्यातील काही मतदारसंघात राडा आणि हाणामारीच्या घटना देखील घडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगावात समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आता येवला मतदारसंघात मतदान केंद्रावर स्थानिकांनी रोखल्याची घटना घडली. या घटनेनंतर मतदारसंघात एकच चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांना मतदान केंद्रात जाण्यास विरोधकांनी अडवले. येवल्यातील खरवंडी मतदान केंद्रावरील ही घटना आहे.

 सकाळी नांदगाव, दुपारी येवला; नाशिक तापलं, छगन भुजबळांना स्थानिकांनीच रोखलं
Malegaon News : नाशिक मर्चंट बँकेतील १२ खात्यात १०० कोटींची उलाढाल; खातेदार मात्र अनभिज्ञ

स्थानिकांनी अडवल्यानंतर, मी उमेदवार असल्याने मला मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार आहे, असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी दिलं. यावेळी मतदान केंद्रावर स्थानिक आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. स्थानिक आणि छगन भुजबळ यांच्यामधील बाचाबाची झाल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात पसरली.

 सकाळी नांदगाव, दुपारी येवला; नाशिक तापलं, छगन भुजबळांना स्थानिकांनीच रोखलं
Maharashtra Political News : बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का; अधिकृत उमेदवाराचा मतदानाआधीच भाजपमध्ये प्रवेश

सुहास कांदेंच्या धमकीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

सुहास कांदे यांच्या धमकीवर छगन भुजबळ म्हणाले, 'दोन्ही उमेदवार समोर आले हा मुद्दा नाही. कांदे यांच्याशी संबंधित व्यक्तीची शाळा आहे. तिथे हजार लोक आणून ठेवले होते. सचिन मानकर हिस्ट्री शीटर तिथे पिस्तूल घेऊन आला. तुला मारून टाकेल, असे समीर यांना बोलला'.

 सकाळी नांदगाव, दुपारी येवला; नाशिक तापलं, छगन भुजबळांना स्थानिकांनीच रोखलं
Kalyan Assembly Election Voting: कल्याणच्या रस्त्यावर लिहिलेल्या ४ आकड्यामागचं रहस्य काय, मनसे आक्रमक

'पोलिसांनी त्याला गाडीत बसवले. त्यानंतर सोडून दिले. पोलीस असे वागत असतील तर कसं करणार. मी एसपींना सांगितले आहे. तुम्ही असे कराल तर तिथे हत्या पडतील, याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची असेल. या रीतीन दादागिरी चालू असेल तर आम्हीही लढायला तयार आहोत. येथे हत्या होतील. पोलीस यंत्रणा ताब्यात घेतली आहे. या दादागिरीविरोधात समीर भाऊ निवडणूक लढवत आहेत, असे छगन भुजबळ पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com