Malegaon News : नाशिक मर्चंट बँकेतील १२ खात्यात १०० कोटींची उलाढाल; खातेदार मात्र अनभिज्ञ

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील १२ बेरोजगार तरुणांच्या नावावर बनावट कंपन्या तयार करून कुणाच्या नावावर १० तर कुणाच्या नावावर १५ कोटी अशा रकमेपर्यंत व्यवहार
Malegaon News
Malegaon Saam tv
Published On

अजय सोनवणे

मालेगाव (नाशिक) : नाशिकच्या मालेगाव येथील मर्चेंट बँकेच्या शाखेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जवळजवळ १२ खात्यांमध्ये शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे. शहरातील बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून ही उलाढाल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून ज्यांच्या नावे हे व्यवहार होत आहेत; त्यांना मात्र याबाबत काहीही कल्पना नाही. शिवसेना पदाधिकारी व बेरोजगार तरुण यांनी मालेगांव येथे पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगावातील १२ बेरोजगार तरुणांच्या नावावर बनावट कंपन्या तयार करून कुणाच्या नावावर १० तर कुणाच्या नावावर १५ कोटी अशा रकमेपर्यंत व्यवहार नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत करण्यात आले आहे. या तरुणांना मालेगाव बाजार समितीत नोकरीचे आमिष दाखवत सिराज अहमद या इसमाने तरुणांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सह्या घेत नाशिक मर्चेंट बँकेत (मालेगाव शाखा) बनावट (Malegaon) खाती उघडली. यानंतर त्या खात्यावरून गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये शेकडो कोटींचे आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे.

Malegaon News
Dhanajay Munde : महाराष्ट्रात २८८ मतदारसंघात निवडणूक मग परळीची चर्चा का?; धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा

पोलिसात तक्रार 

दरम्यान हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर या १२ तरुणांनी मंत्री दादा भुसे यांच्याकडे धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून न्यायाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमी शिवसेना पदाधिकारी व बेरोजगार तरुण यांनी पत्रकार परिषद घेत मागणी केली. या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून हा व्यवहार कोणी केला? यामागे कोणाचा हात आहे? याबाबत पोलिसांकडून चौकशी सूरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com