बारामतीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली
पुरुषोत्तम जगताप यांचे सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत बंड
पुरुषोत्तम जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुरुषोत्तम जगताप यांचे निलंबन
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने
बारामतीमधील सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पक्षाच्या बड्या नेत्याची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्याविरोधात पक्षाने मोठी कारवाई केली. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुरुषोत्तम जगताप यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटातून बाहेर पडत भाजपशी हात मिळवणी केली आणि स्वतंत्र पॅनल उभा केला.
पुरूषोत्तम जगताप यांनी भाजपसोबत येत स्वतंत्र पॅनल उभा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांच्याविरोधात कारवाई करत त्यांचे तात्काळ निलंबन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटांने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पुरूषोत्तम जगताप यांच्याविरोधात ही कारवाई केली. या कारवाईमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संदीप बांदल यांनी पुरूषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई केल्यानंतर सांगितले की, 'माजी चेअरमन आणि काही आमच्या संचालकांनी पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केले आहे. या ठिकाणी आपण अजितदादांचे विचार पुढे घेऊन जात असताना या लोकांनी अतिशय चुकीचं काम केल्यामुळे त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केले आहे.'
सोमेश्वर साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध जर झाली असती तर ती स्वर्गीय अजितदादांसाठी खरी श्रद्धांजली ठरली असती असं भावनिक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी प्रचार सभेत व्यक्त केले. त्यांनी पुरूषोत्तम जगताप यांच्याबात प्रतिक्रिया देताना सांगतिले की, 'पुरुषोत्तम जगताप यांनी चुकीची बाब केली. दादा सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आमच्या मनात ही तीच गोष्ट होती. पुरुषोत्तम जगताप यांचं बंड अगोदर ठरलं होत. मला प्रचारादरम्यान जाणवलं आहे. खरंतर जगताप यांनी असं करायला नको होतं. कारखाना हा काय कोणी एकटा नाही चालवू शकत.'
दरम्यान, बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी अजित पवार गटातून बाहेर पडून भाजपशी हात मिळवणी करत पॅनल उभा केला आहे. या प्रचारात मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.