BJP MP Accident : मोठी बातमी! भाजप खासदाराच्या कारने २ जणांना उडवले, भंडाऱ्यात भीषण अपघात

BJP MP Bharti Pardhi Car Accident : मध्यप्रदेशातील बालाघाटच्या भाजप खासदार भारती पारधी यांच्या वाहनाची भंडाऱ्यातील तुमसर-रामटेक महामार्गावर दुचाकीला धडक बसली. या अपघातात पंजाबचे दोन मजूर गंभीर जखमी झाले.
Bharti Pardhi car accident in Bhandara
Bharti Pardhi car accident in BhandaraSaam tv
Published On: 

शुभम देशमुख, भंडारा प्रतिनिधी

Bharti Pardhi car accident in Bhandara : मध्यप्रदेशातील बालाघाट येथील भाजप खासदार भारती पारधी (MP Bharti Pardhi) यांच्या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली आहे. भंडाऱ्यातील तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील उसर्रा येथे हा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे २ जण गंभीर जखमी झाले आहेत. (BJP MP Bharti Pardhi vehicle hits bike)

सुरजित सिंग आणि तसमिरा मेहरा अशी अपघातातील जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही पंजाबचे रहिवासी असून भंडारा जिल्ह्यात भात कापणीच्या 'हार्वेस्टर' मशीनवर मजूर म्हणून कामासाठी आले होते. जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Bharti Pardhi car accident in Bhandara
Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणात गोवा पोलिसांकडून गुन्हा दाखल; कारण काय?

अपघात कसा घडला?

खासदार भारती पारधी या स्वतः आपल्या वाहनातून बालाघाट येथून नागपूरच्या दिशेने प्रवास करत होत्या. तुमसर तालुक्यातील उसर्रा गावाजवळ त्यांच्या भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.

Bharti Pardhi car accident in Bhandara
ladki Bahin Yojana : दसरा की दिवाळी? लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

पोलिसांत गुन्हा दाखल

अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मजुरांना उपचारासाठी तातडीने भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आंधळगाव पोलिसांनी अपघाताची नोंद करून चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com