ladki Bahin Yojana : दसरा की दिवाळी? लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे हप्ते अद्याप प्रलंबित आहेत. दसऱ्यानंतर १५०० रुपये मिळणार की दिवाळीत दोन्ही हप्त्यांचे ३००० रुपये खात्यात जमा होणार?
Ladki Bahin Yojana GR Released
Ladki Bahin Yojana GR Releasedmeta ai
Published On: 

Ladki Bahin Yojana September October Installments Update : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना’ योजनेतील लाभार्थी महिला सध्या पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या अखेरीस महिलांच्या खात्यात जमा झाला होता. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे हप्ते अजून बाकी आहेत. त्यामुळे दसऱ्याला १५०० रूपये येणार की दिवाळीत दोन्ही हप्ते एकत्र मिळणार? अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

पुढील आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जर सरकारने फक्त सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय घेतला, तर दसऱ्यानंतर लगेचच या संदर्भातील शासन निर्णय (GR) काढला जाईल. त्यानंतर २५ तारखेनंतर टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Ladki Bahin Yojana GR Released
Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर 'या' दिवशी ३,००० येणार? महत्त्वाचं कारण आले समोर

पण जर ऑक्टोबरच्या शेवटी पैसे जमा झाले नाहीत, तर सरकार सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये दिवाळीत म्हणजेच नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच एकत्र महिलांच्या खात्यावर वर्ग करू शकते, अशीही चर्चा सुरू झालेली आहे. राज्यात सध्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींच्या हप्त्याबाबत सरकार काय निर्णय घेणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

Ladki Bahin Yojana GR Released
ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता 'या' दिवशी होणार जमा, वाचा मोठी अपडेट

अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

सध्या राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, हप्ता कधी आणि कसा मिळणार यावर सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सरकार नक्की काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com