

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांना अटक
पवई पोलिसांनी ही कारवाई केली
हिरानंदानीतील विकासकाची फसवणूक केल्याचा आरोप
२०२३ मध्ये गणेश चुक्कल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता
मुंबई पोलिसांनी मनसेच्या बड्या नेत्याला अटक केली. मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक करण्यात आली. हिरानंदानीत विकासकाची फसवणूक केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०२३ मध्ये या प्रकरणी गणेश चुक्कल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी विकासकाची फसवणूक केली होती आणि खंडणी मागितली होती. विकासकाने पोलिस ठाण्यात धाव घेत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आज त्यांच्याविरोधात कारवाई करत पोलिसांनी त्यांना अटक केली. सध्या त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.