MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

MNS Student Sena And ABVP Fight: मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील साठ्ये महाविद्यालयाबाहेर विद्यार्थी सदस्य नोंदणीवरून मनविसे आणि एबीव्हीपी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. पाहता-पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
MNS Student Sena And ABVP Fight:
Sathaye College Clash: Mns Students Sena And Abvp Workers Clash In Mumbaisaam tv
Published On
Summary
  • मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील साठ्ये महाविद्यालयाबाहेर तुफान राडा झाला.

  • मनविसे आणि एबीव्हीपी कार्यकर्ते विद्यार्थी सदस्य नोंदणीवरून आमनेसामने आले.

  • सुरुवातीच्या वादाचे रूपांतर पाहता-पाहता जोरदार हाणामारीत झाले.

मुंबईतील विलेपार्ले पूर्वमध्ये असलेल्या नामांकित साठ्ये महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. नवीन विद्यार्थी सदस्य नोंदणीवरून दोन्ही संघटनेनेतील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. (Sathaye College Clash: Mns Students Sena And Abvp Workers Clash In Mumbai)

MNS Student Sena And ABVP Fight:
Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

महाविद्यालयात नव्या विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणी मोहिमेवरून या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. पाहता-पाहता या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाल्याने महाविद्यालय परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

MNS Student Sena And ABVP Fight:
Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची? कोर्टातील १० महत्त्वाचे मुद्दे

या हाणामारीची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गोंधळ घालणाऱ्या दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे कॉलेज परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते.

मनविसे आणि एबीव्हीपी आमनेसामने

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतील विविध महाविद्यालयांच्या बाहेर नवीन विद्यार्थ्यांसाठी सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात येत आहे. गुरुवारी विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मनविसे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन्ही संघटनांचे स्टॉल समोरासमोर लावले होते. यादरम्यान, स्टॉलच्या जागेवरून आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या गटाकडे आकर्षित करण्याच्या चढाओढीवर सुरू झाली.

याचदरम्यान दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होत हाणामारी झाली. विद्यार्थिनींची बळजबरीने नोंदणी करत असल्याचा मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. साठ्ये महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना एबीव्हीपीचे कार्यकर्ते बळजबरीने पकडून आपल्या स्टॉलवर नेत होते आणि जबरदस्तीने त्यांची सदस्य नोंदणी करत होते, असा दावा मनसेने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com