Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

thackeray vs shinde social media leaders join shinde sena : ठाकरेसेनेला शिंदेंच्या सेनेने जोरदार झटका दिला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यामुळं शिंदेंच्या सेनेची 'सोशल' पॉवर वाढलीय.
शिंदेंचा उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का
Thackeray Vs Shinde Shivsenasaam tv
Published On

शिवसेना कुणाची ? ठाकरे की शिंदेंची?...शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, राज्यात शिंदेंच्या सेनेने 'सोशल' स्ट्राइक करून ठाकरेंच्या सेनेला जोरदार झटका दिला आहे. शिंदेसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी ठाकरे सेनेच्या सोशल मीडिया विभागातील महाराष्ट्र आणि मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.

ठाकरे गटाचे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक अमित भाद्रीचा, आशिष पढयार, विनायक डायरे तसेच मुंबई समन्वयक प्रथमेश बोऱ्हाडे, स्वप्नील सावंत, ॲड. दक्षता ठाकूर आणि सुशांत कावीर यांनी समर्थकांसह शिंदेसेनेत प्रवेश केला. यामुळं शिंदेसेनेच्या सोशल मीडिया विभागाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे.

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे श्रीकांत शिंदेंनी स्वागत केले. शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी; तसेच पक्षाचे विचार आणि विकासाचे काम अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन शिंदेंनी यावेळी केलं.

शिंदेंचा कानमंत्र

सोशल मीडिया हे सध्याच्या काळातील जनतेशी थेट संवाद साधण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाचा योग्य आणि सकारात्मक पद्धतीने वापर करून शिवसेनेचे विचार, पक्षाची भूमिका, सरकारच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी सोशल मीडिया विभागावर आहे. त्यामुळे केवळ पक्षाच्या कार्यक्रमांपुरते सोशल मीडिया काम मर्यादित न ठेवता, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांना आणि अपेक्षांना व्यासपीठ देण्याचे कामही सोशल मीडिया विभागाने करावे, असा कानमंत्र श्रीकांत शिंदेंनी यावेळी दिला.

यावेळी शिवसेना सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा, मुंबई विभाग प्रमुख राज कुळकर्णी, महादेव सलवडे, मयुर मगर तसेच सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदेंचा उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का
Raj Thackeray : भाजपच्या बड्या नेत्याकडून राज ठाकरेंचा अपमान, वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com