एजंटकडून कर्जवसुलीसाठी रुग्णालयातच छळ, बँक कर्मचाऱ्याची शेतकरी महिलेवर मुजोरी; पोलीस आणि वसुली एजंटचं साटंलोटं?

Shocking Incident in Akola: एका एजंटनं चक्क रुग्णालयात दाखल असलेल्या शेतकरी महिलेला गाठून तिचा कर्जवसुलीच्या छळ केलाय. कसा घडलाय हा धक्कादायक प्रकार... पाहूयात या रिपोर्टमधून...
BANK RECOVERY AGENT HARASSES
BANK RECOVERY AGENT HARASSESsaam tv
Published On: 

राज्यात ऐन दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांचा छळ सुरूच असल्याचं वारंवार समोर येतंय. अकोल्यातल्या मुर्तिजापूरमध्ये शेतकऱ्याकडून कर्जवसुलीसाठी बँकेंच्या एजंटनं थेट रुग्णालयातच धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...वैशाली इंगळे या महिला शेतकऱ्यानं आयडीएफसी बँकेचं कर्ज काढलं होते. मात्र कर्जाचे हप्ते थकल्यानं त्यांच्यामागे बँक कर्मचाऱ्यानं तगादा लावला. एवढ्यावरच हा कर्मचारी थांबला नाही. तर इंगळे या रुग्णालयात दाखल असतानाही त्यानं थेट रुग्णालयातच त्यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला. हा प्रकार समोर आल्यानंतर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वसुली कर्मचाऱ्याला धारेवर धरलयं...

दरम्यान कर्जाची रक्कम लवकरच भरू, असं सांगूनही बँकेचा एजंट रुग्णालयात आल्यानं पीडित महिलेलाही मनस्ताप सहन करावा लागलाय... मात्र दुष्काळात शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली न करण्याचे आदेश सरकारनं दिलेले असताना वसुलीसाठी छळ सुरूच असल्याचा आरोप शेतकऱी संघटनेच्या नेत्यांनी केलाय.

यासंदर्भात आम्ही बँकेची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मुळात शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्या एजंट्सविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित आहे. मात्र पोलीस आणि एजंटमध्येच साटलोटं असल्यामुळेच कारवाईला टाळाटाळ करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झालीय. पोलिसांनी हे संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी या वसुली एजंट्सवर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा हा संशय आणखी बळावणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.