

मुंबईतील शंभर वर्षे जुन्या बेकरीचा एफएसएसएआय परवाना निलंबित
काळबादेवीतील क्यानी अँड कंपनीवर एफडीएची मोठी कारवाई
मुंबई बेकरीमध्ये उंदीर मांजर माश्या आणि झुरळे आढळल्याने कारवाई
संजय गडदे, साम प्रतिनिधी
काळबादेवी येथील मे. Kyani & Co. या आस्थापनात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याने अन्न सुरक्षा विभागाने कठोर कारवाई केलीय. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 27 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आलेल्या तपासणीत अस्वच्छतेचे धक्कादायक प्रकार समोर आले. या पार्श्वभूमीवर आस्थापनाचा FSSAI परवाना क्र. 11517001000318 तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.
तपासणीदरम्यान अन्न तयार करणे आणि साठवणुकीच्या परिसरात मांजर, उंदरांची विष्ठा, जिवंत माश्या तसेच मृत झुरळे आढळून आले. याशिवाय रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले असल्याचे निदर्शनास आले. प्रक्रिया विभागात उघडे सांडपाणी मॅनहोल असल्याचेही आढळले. अन्न हाताळणीच्या पद्धतीतही गंभीर त्रुटी आढळल्या. काही अन्नपदार्थ जमिनीवर ठेवण्यात आले होते. तसेच कच्चे पीठ छापील वर्तमानपत्राने झाकण्यात आल्याचे तपासणीत समोर आले. कर्मचाऱ्यांकडून आवश्यक स्वच्छता आणि वैयक्तिक संरक्षण साधनांचा (PPE) वापर केला जात नसल्याचेही आढळले. कच्चे आणि तयार अन्नपदार्थ यांच्यात योग्य विभाजन नसल्याचेही विभागाच्या निदर्शनास आले.
या गंभीर अन्न सुरक्षा आणि स्वच्छता त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्यास तात्काळ धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 32(3) च्या परंतुकानुसार परवाना निलंबित करण्यात आला आहे. परवाना निलंबित केल्यानंतर आस्थापनाला अन्नपदार्थांची खरेदी, उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विक्री आणि वितरण तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी संबंधित आस्थापनावर अन्न सुरक्षा विभागाकडून देखरेख ठेवण्यात येत आहे. ही कारवाई “सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र” या धोरणांतर्गत करण्यात आली आहे.
एफडीएच्या धडक कारवाईत मुंबईतील लोअर परेलच्या प्रसिद्ध Subwayचा FSSAI परवाना निलंबित करण्यात आलाय. Subwayच्या फ्रीजमध्ये बुरशीसदृश थर, दुर्गंधी आणि जिवंत झुरळ आढळलेत.अन्न हाताळणी परिसरात पाणी साचलेले, घाण आणि अस्वच्छता, शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची अयोग्य साठवणूक असल्यानं ही कारवाई करण्यात आलीय.
वजनकाटे व पॅकेजिंगवर जिवंत झुरळे, अन्न तयार करण्याच्या ठिकाणी पाल, माश्या आणि अळ्या आढळल्या आहेत. उघड्या अन्नपदार्थांजवळ अस्वच्छ मॉपच्या बादल्या; वर्तमानपत्राच्या थेट संपर्कात अन्नपदार्थ येत असल्यानं कारवाई करण्यात आलीय.
झुरळे, कीटक व उंदरांचा प्रादुर्भाव; उंदरांनी कुरतडलेले पदार्थ आढळले
पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र नाहीये.
धूळ-जळमटे, कचराकुंडीचा अभाव आणि स्वच्छतेचे वेळापत्रक नाही
माल जमिनीवर अस्ताव्यस्त; नियंत्रित तापमानात साठवणूक नाही; FIFO/FEFOचे पालन नाही
विलेपार्लेतील डॅफोडिल्स फास्ट फूड इनचा परवाना निलंबित
आस्थापना अत्यंत अस्वच्छ; जमीन, भिंती व साठवणूक डब्यांवर धूळ-घाण आणि जळमटे
रेफ्रिजरेटर व डीप फ्रीझर घाणेरडे; तापमान दर्शक बंद, एक रेफ्रिजरेटर बंद अवस्थेत
कामगार साठवणूक क्षेत्रातच झोपत असल्याचे आढळले; वैयक्तिक वस्तू अन्नपदार्थांसोबत नारळ सोलण्याचे काम बाथरूमच्या भागात सुरू असल्याचे निदर्शनास
अन्न सुरक्षा व स्वच्छता नियमांचे उल्लंघन; अन्नपदार्थांची खरेदी, उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विक्री व वितरण बंद
संबंधित आस्थापना खाली करण्याची कारवाई, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू
QSR Brands India Pvt. Ltd.विरुद्ध कायदेशीर कारवाई
स्वच्छता व आरोग्यविषयक निकषांचे उल्लंघन आढळल्याने FSS Act अंतर्गत कारवाई
फोर्टमधील M/s Astra Corporation (Royal China)विरुद्ध कायदेशीर कारवाई
सांताक्रूझ पश्चिमेतील M/s United Bakery & Storesविरुद्ध कायदेशीर कारवाई
जोगेश्वरी पश्चिमेतील M/s Shree Padmavati Enterprisesविरुद्ध कायदेशीर कारवाई
खार पश्चिमेतील Hotel Purandar Vilasविरुद्ध कायदेशीर कारवाई
वरील आस्थापनांमध्ये FSSAI Schedule-4 मधील स्वच्छता व आरोग्यविषयक निकषांचे उल्लंघन
वैध FSSAI परवाना/नोंदणी नसतानाच व्यवसाय सुरू असल्याचे आढळले.स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचेही उल्लंघन झाल्याचं आढळून आले. परवाना/नोंदणी आणि स्वच्छतेच्या त्रुटी दूर करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.
आदेशाचे उल्लंघन केल्यास 2 लाखांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलीय.
विनापरवाना व्यवसाय सुरू ठेवल्यास 6 महिन्यांपर्यंत कारावास आणि 5 लाखांपर्यंत दंडाची तरतूद. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत कारवाई
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.