महाराष्ट्र वेतन नियम 2026 लागू, 8 तास काम दुप्पट ओव्हर टाईम

Maharashtra Employees to Get Double Overtime: नोकरदारवर्गासाठी राज्य सरकारनं नवा कायदा लागू केलाय. यामुळे कर्मचाऱ्यांना आता कामाच्या बदल्यात घसघशीत मोबदला मिळणार आहे. काय आहेत नव्या वेतन कायद्यातल्या तरतुदी? किती मिळणार आहे अतिरिक्त कामाचा मोबदला.? पाहूयात हा रिपोर्ट...
MAHARASHTRA WAGE RULES 2026
MAHARASHTRA WAGE RULES 2026saam tv
Published On: 

राज्यात 5 नोव्हेंबरपासून 'महाराष्ट्र वेतन नियम, 2026' लागू झालाय. सरकारच्या निर्णयामुळे लाखो नोकरदारांचं वेतन सुरक्षित राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानुसार किमान वेतन, कामाचे तास, साप्ताहिक सुट्टी, अनियमित वेतन, वेतन कपात आणि वेतनाची नोंद ठेवण्याबाबत एकसमान कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. नव्या वेतन कायद्यात काय तरतुदी करण्यात आल्या आहेत ते पाहूयात...

'महाराष्ट्र वेतन नियम, 2026' लागू (ऑफिसमध्ये पीसीवर काम करणारे कर्मचारी)

महागाई भत्त्यात वर्षातून 2 वेळा सुधारणा होणार

दररोज 8 तास आणि आठवड्यात 48 तास काम

साप्ताहिक सुट्टी बंधनकारक, सुट्टीला काम केल्यास बदली सुट्टी आणि दुप्पट पगार

पगारातून 50% पेक्षा जास्त कपात नाही आणि पे-स्लीप बंधनकारक

पगार, हजेरी आणि जादा कामाच्या नोंदी 5 वर्षे ठेवाव्या लागणार

खरं तर, असंघटित आणि खासगी क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइमचा मोबदला, पे-स्लीप आणि मनमानी वेतन कपातीविरोधात दाद मागताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि अनेकदा याबाबतीत कर्मचाऱ्यांवर अन्यायच होतो..मात्र, या नव्या कायद्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनविषयक हक्कांना अधिक संरक्षण मिळालंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.