Pune Politics: अर्ज सुरू, फिल्डिंग जोरात; पण ‘तो’ उमेदवार कोण? पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मोठा ट्विस्ट

Pune Graduate Teacher MLC Election: पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी अनेकांची जोरात फिल्डिंग सुरू आहे.
Pune Politics: अर्ज सुरू, फिल्डिंग जोरात; पण ‘तो’ उमेदवार कोण? पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मोठा ट्विस्ट
Pune PoliticsSaam Tv
Published On: 
  • पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचा उमेदवार कोण याची चर्चा

  • पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवारांची फिल्डिंग

  • पुणे पदवीधर शिक्षक निवडणूक २०२६ उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू

  • पुणे विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि महायुतीतील उमेदवारीचा पेच

सागर आव्हाड, पुणे

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी अर्ज नेण्यासही सुरुवात केली आहे. पण प्रमुख राजकीय पक्षांचा उमेदवार कोण? यावर अजूनही पडदा कायम आहे. कारण प्रमुख पक्षांकडून अद्याप उमेदवारांची नावं जाहीर केली नाहीत. एका बाजूला इच्छुक उमेदवारांची गर्दी आणि दुसऱ्या बाजूला पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी पदवीधर मतदारसंघासाठी ३६ व्यक्तींनी ६१ अर्ज नेले आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी १९ व्यक्तींनी ३६ अर्ज नेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे दिसत आहे. प्रमुख पक्षांकडून अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा न झाल्याने राजकीय वर्तुळातील उत्सुकता शिगेला गेली आहे

पुण्यात मयुतीतच ‘पेच’ कायम?

२०२० च्या निवडणुकीत पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली. राज्यात महायुतीचे सरकार आले आणि आता पुणे विभागाच्या दोन्ही जागांवर भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

अशी माहिती समोर आली आहे की, भाजपकडून येत्या २ दिवसांत उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही उमेदवारीसाठी आग्रह धरला जात आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा निर्णय आणि मित्रपक्षांच्या अपेक्षा यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकीय गणितांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune Politics: अर्ज सुरू, फिल्डिंग जोरात; पण ‘तो’ उमेदवार कोण? पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मोठा ट्विस्ट
Vidhan Parishad Election: महायुतीनं उमेदवारी नाही दिली तर आम्ही देऊ; मंगेश चिवटेंना कोणी दिली ऑफर?

पुण्यात ‘शिक्षकांचा आमदार’ कोण?

शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना महाविकास आघाडीकडून संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आणि प्राध्यापक सचिन सानप यांनी ‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’ अशी भूमिका घेत निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे.

शिक्षक संघटनेचे पदाधिकारी नंदकुमार सागर यांचेही नाव इच्छुकांमध्ये घेतले जात आहे. तर शिक्षकेतर संघटनेचे नेते शिवाजी खांडेकर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर कौस्तुभ गावडे देखील या रेसमध्ये उतरले असून त्यांनी देखील फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात फक्त पक्षीय राजकारणच नाही, तर शिक्षक संघटनांचे राजकारणही महत्त्वाचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pune Politics: अर्ज सुरू, फिल्डिंग जोरात; पण ‘तो’ उमेदवार कोण? पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मोठा ट्विस्ट
Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

पदवीधरमध्ये नावांची मोठी ‘फिल्डिंग’

पदवीधर मतदारसंघासाठीही अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. भाजपच्या पुण्यातील मंत्र्यांकडून शरद लाड यांच्या नावासाठी आग्रह धरला जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी त्यांचे नातेवाईक भय्या माने यांना उमेदवारी मिळावी, अशी भूमिका घेतली आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख-जाधव या देखील निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसकडून आमदार विश्वजित कदम यांचे नातेवाईक ऋषिकेश महेंद्र लाड यांच्या नावाचीही चर्चा आहे. म्हणजेच, पक्षाच्या उमेदवारीचा निर्णय होण्याआधीच इच्छुकांनी आपापल्या पातळीवर ‘फिल्डिंग’ लावल्याचे दिसत आहे. आता पक्षश्रेष्ठी नेमकी कुणाला संधी देतात आणि कुणाची उमेदवारी कापली जाते हे पाहणे महत्वाचे राहिल.

Pune Politics: अर्ज सुरू, फिल्डिंग जोरात; पण ‘तो’ उमेदवार कोण? पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मोठा ट्विस्ट
Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

५ जिल्हे पिंजून काढण्याचे आव्हान -

शिक्षक- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीचा सस्पेन्स असला तरी निवडणुकीची वेळ मात्र वेगाने जवळ येत आहे. येत्या ९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अवघ्या १० ते १२ दिवसांत पाच जिल्ह्यांतील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने संघटनात्मक यंत्रणा, मतदार संपर्क आणि प्रचाराचे नियोजन यासाठी उमेदवारांना अक्षरशः धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचारासाठी मिळणारा कमी कालावधी देखील महत्वाचा ठरणार आहे.

Pune Politics: अर्ज सुरू, फिल्डिंग जोरात; पण ‘तो’ उमेदवार कोण? पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मोठा ट्विस्ट
Election Commision : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! फॉर्म ६ मधून SIR चा भाग हटवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com