Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

Bihar UP MLC Polls Candidate List: भाजपने उत्तर प्रदेश- बिहारमधील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. १० उमेदवारांची नावं भाजपने जाहीर केली आहेत.
Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?
Bihar UP MLC PollsSaam Tv
Published On: 
  • भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली

  • शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर

  • बिहार- उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवार

  • उमेदवारांची अधिकृत यादी भाजपने केली जाहीर

भाजपने मंगळवारी बिहार आणि उत्तर प्रदेशातील २०२६ च्या विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमधील १० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. भाजपकडून उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भाजपने संधी दिलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये बिहारमधील नवल किशोर यादव आणि डॉ. एन. के. यादव यांना संधी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशसाठी निवडलेल्या सहा प्रमुख उमेदवारांमध्ये केदार नाथ सिंह आणि हरी किशोर तिवारी यांचा समावेश आहे.

बिहारमधील उमेदवार -

बिहार विधान परिषद निवडणुकीसाठी दरभंगा पदवीधर मतदारसंघातून सर्वेश कुमार यांना आणि तिरहुत शिक्षक मतदारसंघातून नरेंद्र प्रसाद सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटणा येथील शिक्षक मतदारसंघातून नवल किशोर यादव, कोसी पदवीधर मतदारसंघातून एन के यादव यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. नवल किशोर यादव, एन. के. यादव आणि सर्वेश कुमार हे सध्याचे विधान परिषद सदस्य आहेत. ८ जागांपैकी ४ शिक्षक मतदारसंघ आणि ४ पदवीधर मतदारसंघ आहेत. एनडीएमध्ये जेडीयू आणि भाजपने बिहारमध्ये प्रत्येकी ४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

उत्तर प्रदेशमधील उमेदवार -

उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीसाठी वाराणसी पदवीधर मतदारसंघातून केदार नाथ सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने मेरठ पदवीधर मतदारसंघातून दिनेश गोयल यांच्या नावाची घोषणा केली. अशोक कुमार राठोड यांना अलाहाबाद-झांसी पदवीधर मतदारसंघातून संधी देण्यात आली. डॉ. प्रमोद मिश्रा यांना वाराणसी शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचसोबत, आगरा शिक्षक मतदारसंघातून हरि किशोर तिवारी आणि गोरखपूर-फैजाबाद शिक्षक मतदारसंघातून ध्रुव त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?
BJP Leader: भाजपच्या दिग्गज नेत्याला दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये एकूण ११ जागांवर निवडणुका होणार आहेत. भाजपने याआधीच ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. सोमवारी समाजवादी पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. समाजवादीने सर्वच्या सर्व ११ जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये तगडी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे.

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?
Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेसच्या २ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com