

मंगेश चिवटे यांना उमेदवारीची ऑफर कोणी दिली?
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटेंच्या उमेदवारीची चर्चा
महायुतीकडून उमेदवारी नाही मिळाली तर मंगेश चिवटेंना कोण संधी देणार?
रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यादरम्यान मंगेश चिवटेंना एका पक्षानं उमेदवारीची ऑफर दिलीय. शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांच्या नावासाठी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. महायुतीकडून मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळाली नाही, तर राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देऊन त्यांना ताकदीने निवडून आणू, अशी जाहीर घोषणा आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली आहे.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीतील उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही जागांवर महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांनी तयारी सुरू केलीय. पुढील दोन दिवसात भाजप आपले उमेदवारांची घोषणा करेल अशी घोषणा मंत्री चंद्राकांत पाटील यांनी केलीय.
जयसिंगपूर येथे झालेल्या शिक्षक मेळाव्यात यड्रावकर यांनी चिवटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडलीय. दुसरीकडे मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीवरून शिवसेना आक्रमक झालीय. जर महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर तर राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देऊ अशी ऑफर सुद्धा त्यांनी यावेळी दिलीय.
तर शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनीही पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा यासाठी प्रयत्न करू; मात्र उमेदवारी मिळाली नाही, तरी पर्यायी व्यवस्था उभी करून मंगेश चिवटे यांना निवडून आणू, असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, यड्रावकर यांनी आपल्या शिरोळ तालुक्यातील सुमारे १,४०० शिक्षक मतदारांपैकी १,२०० मतांची व्यवस्था करण्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमधील राजकीय रस्सीखेच आणखी चर्चेत आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.