काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्यासह अनेकांनी पक्षाला ठोकला रामराम; सरकारवर गंभीर आरोप करत BRSमध्ये केला प्रवेश

Telangana Politics: तेलंगणातील राजेंद्रनगरमध्ये माजी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष बी. साई रेड्डी यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी BRSमध्ये प्रवेश केला. KTR यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Telangana Politics:
Congress leaders join BRS in Rajendranagar Telanganasaam tv
Published On: 
Summary
  • राजेंद्रनगरमध्ये काँग्रेसशी संबंधित अनेक स्थानिक नेत्यांनी BRSमध्ये प्रवेश केला

  • माजी रंगारेड्डी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष बी. साई रेड्डी यांच्यासह काही माजी स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी BRSमध्ये सहभागी झाले.

  • KTR यांनी काँग्रेस सरकारच्या कारभारावर अनेक आरोप आणि टीका केली

राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड घडलीय. तेलंगणात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. येथील राजेंद्र नगर येथे राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. काँग्रेसचे अनेक नेत्यांनी 'भारत राष्ट्र समिती'मध्ये (BRS) प्रवेश केला. बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव (केटीआर) यांनी या नवीन नेत्यांचे पक्षात स्वागत केले. या नवीन सदस्यांना गुलाबी रंगाची उपरणे (स्कार्फ) प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला बीआरएसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष बदलला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष बी. साई रेड्डी यांनीही बीआरएसमध्ये प्रवेश केलाय. त्याच्यासह बी. राजू, यलाला नरेश, पापालाल सिंग, जयहिंद राव आणि यलाला लावण्या हे देखील बीआरएसमध्ये सामील झाले आहेत. यापैकी काही नेत्यांनी यापूर्वी MPTC सदस्य, सरपंच, बाजार समितीचे संचालक आणि स्थानिक नगरसेवक म्हणून काम केले आहे.

Telangana Politics:
राजकारणातील मोठी बातमी; बंडखोर खासदारांसंदर्भात लोकसभा अध्यक्षांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

BRS नेत्यांच्या मते, यातील अनेक नवीन सदस्य दीर्घकाळापासून काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री सबिता इंद्रा रेड्डी, जगदीश रेड्डी आणि श्रीनिवास गौड हे देखील उपस्थित होते. आमदार पाडी कौशिक रेड्डी आणि एमएलसी नवीन रेड्डी यांच्यासह अनेक नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान सबिता इंद्रा रेड्डी यांनी सांगितले की, अनेक नेते केसीआर यांना तेलंगणाचे रक्षक मानतात. त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका करताना असा दावा केला की, जर केसीआर सत्तेत राहिले असते, तर मेट्रो आतापर्यंत शमशाबादपर्यंत पोहोचली असती.

केटीआर यांनी काँग्रेस सरकारवर अनेक आरोप केले

या कार्यक्रमादरम्यान, केटीआर यांनी आपल्या भाषणात काँग्रेस सरकारबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकार दडपशाही करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हैदराबादमध्ये संगीत आणि डीजेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचाही उल्लेख करताना त्यांनी दडपशाहीचा आरोप लावला.

Telangana Politics:
भाजपमध्ये पुन्हा फेरबदल! प्रभारींनंतर नवीन २४ सह-सरचिटणीस नियुक्त; महाराष्ट्राची धुरा कोणाकडे?

रिअल इस्टेट क्षेत्रात काँग्रेस सरकार ३० टक्के कमिशनची मागणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याव्यतिरिक्त, त्यांनी रायदुर्ग-शमशाबाद मेट्रो प्रकल्पाचा मुद्दाही उपस्थित केला. केटीआर यांच्या मते, या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया बीआरएस सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाली होती. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ही निविदा रद्द करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com