'ऑपरेशन टायगर'आधी भाजपचं 'ऑपरेशन लोटस'! शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मोठं खिंडार

Maharashtra Politics: महायुतीतील मित्रपक्षांमधील कुरघोडीचं राजकारण जोरदार सुरू आहे. साताऱ्यात शिंदेसेनेनं भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर आता भाजपनं शिंदेसेनेला धक्का दिलाय. भाजपनं शिंदेसेनेला कुठे खिंडार पाडलंय?.. पाहूयात या रिपोर्टमधून...
OPERATION LOTUS IN PALGHAR
OPERATION LOTUS IN PALGHARsaam tv
Published On: 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात ऑपरेशन टायगर 3.0 राबवणार असल्याची चर्चा सुरु असतानाच प्रत्यक्षात शिंदेंसेनेलाच पालघर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसलाय आणि तो ही त्यांचा मित्र पक्ष भाजपकडून... शिंदेसेनेचे नाराज माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या उपस्थितीत अवघ्या पाच वर्षातच कमळ हाती घेतलयं...मात्र भाजप पक्षप्रवेशामागे नेमकी काय पार्श्वभूमी आहे? पाहूयात...

2019 मध्ये श्रीनिवास वनगा पालघर विधानसभेतून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. पुढे 2022 च्या शिवसेनेतील बंडावेळी श्रीनिवास वगना एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीला गेले. मात्र गुवाहाटीला गेलेल्य़ा आमदारांपैकी फक्त श्रीनिवास वनगांचे तिकिट पक्षानं 2024 च्या विधानसभेत कापलं.. त्यानंतर वनगांनी पक्षाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली

विधानसभेचं तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा भाजपच्या राजेंद्र गावितांविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशीही चर्चा होती...मात्र 13 तास नॉट रिचेबल असलेल्या वनगांनी तसं काहीचं केलं नाही...पुढे पक्षांतर्गत राजकारणात आपली नाराजी वाढत गेल्याचं त्यांनी स्वत:च भाजप पक्षप्रवेशावेळी सांगितलयं...

मुळात श्रीनिवास वनगा आणि त्यांचे वडील माजी खासदार चिंतामण वनगा हे भाजपचे कट्टर समर्थक राहिलेत.चिंतामण वनगांना भाजपकडून आमदारकी, खासदारकी मिळली होती...त्यामुळे श्रीनिवास वनगांसाठी भाजप पक्षप्रवेश सोप्पा होता.या पक्षप्रवेशानंतर शिंदेसेनेने मात्र नाराजी व्यक्त केलीय...

महायुतीतच फोडाफोडीचं राजकारण घडत असल्यानं वनगांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद मात्र वाढलीय..पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात नालासोपारा मतदारसंघातून राजन नाईक, वसई विधानसभेतून स्नेहा दुबे-पंडित, विक्रमगडमधून हरिश्चंद्र भोये असे भाजपचे 3 आमदार आहेत..त्याशिवाय पालघर लोकसभेचं प्रतिनिधित्व भाजप खासदार हेमंत सावरांकडे आहे..त्याउलट पालघरमधून राजेंद्र गावित आणि बोईसरमधून विलास तरे हे शिंदेसेनेचे 2 आमदार आहेत..त्याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले हे डहाणू विधानसभेचे आमदार आहेत..

या राजकीय समीकरणांसोबतच याची अजून एक बाजूही आहे.. भाजपचे गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री आहेत.. त्यामुळे नाईक विरुद्ध शिंदे हा सुप्त संघर्ष ठाणे, नवी मुंबईत सुरु असतानाच पालघरमध्ये थेट ऑपरेशन लोट्स यशस्वी झालयं. ही जर सुरवात मानली तर 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पालघरमध्ये भाजप- शिंदेसेनेतील वाद उफाळून येणार? हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.