Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News : मावळ पॅटर्नला लोणावळ्यात ब्रेक! भाजपाचा स्वबळाचा निर्णय आणि राष्ट्रवादीचा डाव रंगणार का?

Maharashtra Local Body Election : लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत रंगली आहे. विकासाचे आश्वासने, भ्रष्टाचाराचे आरोप आणि नवे राजकीय समीकरणे या सर्वामुळे निवडणूक चढ-उतारांनी भरलेली आहे. ४८ हजारांहून अधिक मतदार लोणावळ्याचा विकास मार्ग ठरवणार आहेत.

Alisha Khedekar

लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत रंगणार

विकास प्रकल्प, भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि नवी राजकीय समीकरणे निवडणुकीला ताप देत आहेत

मावळ पॅटर्नला लोणावळ्यात धक्का

48 हजार मतदार 27 नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष निवडणार

थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा खंडाळ्यातील थंड वातावरण थंडीत नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने तापू लागले आहे. लोणावळ्यात आपले राजकीय प्राबल्य प्रस्थापित करण्यासाठी येथील काही प्रस्थापित मंडळींना शह देण्यासाठी कट कट शहाचा राजकीय खेळ सुरू केला आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि त्या पक्षांच्या मातब्बरांचं राजकारणात नव्याने शिरगाव करणाऱ्या इच्छुकांनी उमेदवारांसाठी चंग बांधला आहे.

मागील काही दिवसापासून मावळात मामा-भाच्याच्या 'दे टाळी मला' चे राजकीय नाट्य संपूर्ण मावळ्याने पाहिले याच टाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या तथाकथित फॉर्मुल्याने उदयास आलेल्या मावळ पॅटर्नला लोणावळ्यातील राजकीय घडामोडींनी सुरुंग लावला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी स्वभावाचा मार्ग स्वीकारला आहे.

लोणावळ्यात एकूण 13 प्रभागातून 27 नगरसेवक तसेच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. 48 हजार 373 मतदार लोणावळ्याच्या विकासाची दिशा ठरवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी महायुती म्हणून एक प्रस्ताव दिला होता अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष पदावर केलेल्या दावा भाजपला कसा पचनी पडेल असा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्या संदर्भात ठेवलेल्या प्रस्ताव मान्य नसल्याने हा फार्मूला भाजपने फेटाळून लावून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकही नगरसेवक राष्ट्रवादीचा नसणाऱ्या या नगरपरिषद मध्ये आमदार सुनील शेळके चा सत्ता स्थापित करण्यासाठी मोठा कस लागणार आहे.

दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरावट करत आघाडी घेतली आहे.. मात्र लोणावळा नगरपरिषद मध्ये एकूण नगराध्यक्ष पदासाठी विविध पक्षातील सात नागरिकांनी अर्ज दाखल केलेले आहे. मात्र मुख्य लढत राष्ट्रपती काँग्रेसची राजेंद्र सोनवणे भाजपचे गिरीश कांबळे आणि शिवसेना आरपीआयची सूर्यकांत वाघमारे यांच्यातच होणार आहे.

राजेंद्र सोनवणे काय म्हणाले?

मी नगराध्यक्ष झाल्यानंतर भुशी डॅम, टायगर पॉईंट येथे, स्काय वॅक, हा प्रकल्प पाच वर्षात मी पूर्ण करणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दरवर्षी येतात मात्र त्यांच्यासाठी वाहतुकीची मोठी समस्या आहे ते मी पूर्ण करणार आहे. रोपवे, लोणावळ्यात क्रीडा संकुलन नाही ते तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आरोग्याची सुद्धा दक्षता घेतली जाणार आहे. भाजी मंडई येथे मोठ्या प्रमाणात ट्राफिक ची समस्या आहे येथे कार पार्किंगची व्यवस्था करणार आहे. टायगर पॉईंट येथे स्काय बॅग झाल्यामुळे बेरोजगार मुलांना येथे नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहे.असे राजेंद्र सोनवणे म्हणाले.

नागरिकांनी व्यक्त केली अपेक्षा

मावळ आमदार सुनील शेळके यांनी मावळचा मोठा विकास केलेला आहे. आणि राजेंद्र सोनवणे हे अण्णांचे उमेदवार आहे आणि ते जर निवडून आले तर आणखी लोणावळ्याचा विकास होईल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना उमेदवार सूर्यकांत वाघमारे काय म्हणाले?

लोणावळा नगरपरिषद मध्ये गेले 25 वर्ष मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. दोन हजार साली लोणावळा नगरपरिषद बरखास्त झाली, त्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हाच कुरण म्हणून ही नगरपालिका प्रचलित आहे. स्विमिंग, टॅंक मध्ये घोटाळा. दररोज या नगरपरिषदेचे 25 घोटाळे बाहेर काढून जनतेसमोर मांडणार आहे भ्रष्टाचार मुक्त लोणावळा हे अभियान घेऊन भ्रष्टाचार करणार नाही आणि कोणाला करू देणार नाही हे वचन देऊन सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष च्या निवडणुकीत उभा असणार आहे. मी शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या युतीच्या माध्यमातून मी ही निवडणूक लढत आहे. दरम्यान भ्रष्टाचारामध्ये कोण कोण सामील झाले कोणत्या कोणत्या स्वरूपाचे भ्रष्टाचार याचा भांडाफोड येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारात करणार आहे. असे वक्तव्य शिवसेना उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी केले आहे.

राजकीय विश्लेषक काय म्हणाले?

तळेगाव नगर परिषदेची स्थापना 1877 साली झाली आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजप नऊ नऊ सदस्य निवडून आले आहे साथ काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले सहा शिवसेना एक आरपीआय तर आणि चार अपक्षांचे नगरसेवक निवडून आले. मात्र यात एकही नगरसेवक राष्ट्रवादीचा नव्हता. त्यावेळी भाजपच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी पाच वर्ष आपला कार्यकाल पूर्ण केला. आता मात्र भाजपचे गिरीश कांबळे राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनवणे आणि शिवसेनेचे सूर्यकांत वाघमारे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. त्यावेळी जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक नसला तरीही आता सुनील शेळके हे दोन वेळा आमदार झाले त्यांची लोणावळा नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे यावर्षी आपली सत्ता स्थापन करण्यासाठी मोठा कस आमदार सुनील शेळकेचा लागणार आहे. असे राजकीय विश्लेषक नासिर शेख म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate : सोन्याचे भाव अचानक बदलले; एका दिवसात दराने पलटली बाजी; आजचा एक तोळ्याचा भाव किती?

Banarasi Saree : अस्सल बनारसी साडी ओळखण्याच्या ७ ट्रिक्स

Shocking : भंडाऱ्यात हत्येचा थरार! धारदार शास्त्राने हत्या केली, मृतदेह रेल्वेरुळाजवळ नाल्यात फेकला

Maharashtra Politics: विदर्भात मोठी राजकीय घडामोड, काँग्रेसला खिंडार; २२१ पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

De De Pyaar De 2 Collection : अजय देवगणचा 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 50 कोटींच्या उंबरठ्यावर, मंगळवारी कमाई किती?

SCROLL FOR NEXT