Mumbai : धक्कादायक! विहारातील गौतम बुद्धांच्या मूर्तीची चोरी, मुंबई पोलिसांनी तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Mumbai Vikroli Gautam Buddha Idol Theft : मुंबईतील बुद्ध विहारातील गौतम बुद्धांची मूर्ती चोरी करून भंगारात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक करून मूर्ती हस्तगत केली आहे.
Mumbai : धक्कादायक! विहारातील गौतम बुद्धांच्या मूर्तीची चोरी, मुंबई पोलिसांनी तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary

विक्रोळीत बुद्ध विहारातील गौतम बुद्धांची मूर्ती चोरी

चोरट्याने मूर्ती भंगारवाल्याला विकल्याचे उघड

पोलिसांनी २४ तासात मूर्ती आणि आरोपी दोघांना ताब्यात घेतले

घटनेनंतर भीमसैनिक संतापले

मुंबईतून धक्कदायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळी परिसरात एका चोरट्याने चक्क बुद्ध विहारातील गौतम बुद्धांच्या मूर्तीची चोरी केली. धक्कदायक म्हणजे या चोरट्याने ती मूर्ती भंगार वाल्याला विकली. या घटनेनंतर भीमसैनिकांचा राग उफाळला. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी भंगार वाल्याला ताब्यात घेतले आहे. तसेच मूर्ती चोरी करणारा चोर अद्याप फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये घडली आहे. या परिसरात असलेल्या रत्नबोधी बुध्द विहारामध्ये एक गौतम बुद्धांची मूर्ती होती. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका चोरट्याने ही मूर्ती लंपास केली. हे प्रकरण बुद्ध विहारातील कमिटीच्या लक्षात आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. संतप्त झालेल्या भीमसैनिकांनीपोलीस ठाण्यात धाव घेतली.

Mumbai : धक्कादायक! विहारातील गौतम बुद्धांच्या मूर्तीची चोरी, मुंबई पोलिसांनी तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Shocking News : इन्स्टावरून ओळख, लग्नाचं आमिष दाखवलं; तरुणीला घातला ९२ लाखांचा गंडा, प्रसिद्ध रिलस्टारला बेड्या

या चोरट्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. भीमसैनिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासाची सर्व चक्रे वेगाने फिरवल्यानंतर अखेर सीसीटीव्ही च्या माध्यमातून धक्कदायक माहिती समोर आली. मूर्ती चोरलेल्या चोरट्याने माहीम मध्ये गौतम बुद्धांची मूर्ती ही भंगारवाल्याला विकली असल्याचे निष्पन्न झाले.

Mumbai : धक्कादायक! विहारातील गौतम बुद्धांच्या मूर्तीची चोरी, मुंबई पोलिसांनी तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Accident News : नवी मुंबईत अपघाताचा थरारा! भरधाव कार पुलाचं रेलिंग तोडून नदीत कोसळली, तरुणाचा मृत्यू

या प्रकरणी पोलिसांनी भंगार वाल्याला ताब्यात घेतले व मूर्ती हस्तगत केली. तसेच चोरट्याचा शोध घेत चोरट्याला खार परिसरातून ताब्यात घेतले आहे. अधिक तपास विक्रोळी पोलीस ठाणे करत आहे. मात्र २४ तासाच्या आत पोलिसांनी आरोपीचा शोध लावल्यामुळे भीमसैनिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com