सोलापूरमध्ये १८ वर्षीय योगेशने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
आत्महत्येपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर भावनिक शेवटची पोस्ट केली
घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने टोकाचा निर्णय घेतला
प्रेमभंग किंवा वादातून आत्महत्या केली असण्याची शक्यता
सोलापूरमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट करत "मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला,जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे" अशी पोस्ट शेअर केली आहे. मृत तरुणाचे नाव योगेश अशोक ख्यागे असे आहे. योगेशच्या टोकाच्या निर्णयानंतर त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता,तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात. त्याच्या पश्चात आई,वडील आणि एक बहिण असा परिवार आहे. योगेशने आत्महत्या केली त्यादिवशी त्याच्या घरी कोणीही नव्हते. योगेशचे आई-वडील नातेवाईकांकडे गेले होते,तर तो घरात एकटाच होता.
घरी कोणीही नसल्याची संधी साधून योगेशने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी योगेशने इंस्टाग्रामवर स्टोरी टाकत, “मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला,जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे" असे त्याने पोस्ट केले होते. नातेवाईकांकडून परत आल्यानंतर योगेशच्या आई वडिलांना योगेशचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला.
नातेवाईकांनी योगेशला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवले आणि तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले.मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहे. प्राथमिक अंदाजानुसार प्रेमभंगातून किंवा घरगुती वादातून योगेशने आत्महत्या केली असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, योगेशच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.